शिरुर कासार येथे अजान वृक्षाखाली गीता पारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:26 AM2020-12-26T04:26:13+5:302020-12-26T04:26:13+5:30
गीतेचे तत्वज्ञान संपूर्ण जगाला तारक असुन गीता ग्रंथ हा जगण्यासाठी नवी उर्जा देतो. तसेच या ग्रंथात ज्ञान ,वैराग्य आणि ...
गीतेचे तत्वज्ञान संपूर्ण जगाला तारक असुन गीता ग्रंथ हा जगण्यासाठी नवी उर्जा देतो. तसेच या ग्रंथात ज्ञान ,वैराग्य आणि भक्ती बरोबरच कर्म या सर्वांचा प्राधान्याने समावेश असल्याने गीता ग्रंथाला अनन्य साधारण महत्व असल्याचे विवेकानंद शास्त्री यांनी सांगितले. स्वत: विवेकानंद शास्त्री हे अंजान वृक्षाखाली गीता पारायणात सहभागी होते शिवाय महेंद्र महाराज मळेकर, रामदास महाराज , लक्ष्मणराव गाडेकर ,या पारायणासाठी दत्तात्रय परदेशी गुरूजी आवर्जुन बीडहुन आले होते. महिला भाविकांनी या पारायण सोहळ्यात सहभाग नोंदवला. त्यात राधिका देशमुख, सुमेधा देशमुख, मीराताई देशमुख, विमलताई गाडेकर, पुष्पा गाडेकर, अनिता गाडेकर, श्रेया गाडेकर, स्वाती आघाव आदिंसह संस्थानवरील साधकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते . सामुहिक पारायणानंतर गोविंद पाटील यांनी महंत स्वामी विवेकानंद शास्त्री यांचा पुष्पहार घालुन सन्मान केला .