संकल्प निरोगी अभियानास चांगला प्रतिसाद; कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:21 AM2021-07-23T04:21:08+5:302021-07-23T04:21:08+5:30

: येथील ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात संकल्प निरोगी अभियानांतर्गत गुरुवार रोजी घेण्यात आले. यामध्ये अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची ...

Good response to Sankalp Nirogi Abhiyan; Go to the office and check the staff | संकल्प निरोगी अभियानास चांगला प्रतिसाद; कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी

संकल्प निरोगी अभियानास चांगला प्रतिसाद; कार्यालयात जाऊन कर्मचाऱ्यांची तपासणी

Next

: येथील ग्रामीण व प्राथमिक आरोग्य केंद्रात संकल्प निरोगी अभियानांतर्गत गुरुवार रोजी घेण्यात आले. यामध्ये अनेक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची त्या त्या कार्यालयात जाऊन तपासणी करण्यात आली. लहान मुलांना ऑनलाइनद्वारे कोविडविषयी माहिती देण्यात आली.

या शिबिरास तालुक्यातून चांगला प्रतिसाद मिळाला.

संकल्प निरोगी अभियानांतर्गत माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालय व तालुक्यातील ५ प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवार रोजी हे अभियान घेण्यात आले. या अभियानाची सुरुवात अपंगांना प्रमाणपत्राचे वाटप व नोंदणी करण्यात आली. हे प्रमाणपत्र आ. प्रकाश सोळंके, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, आरोग्य उपसंचालक डॉ. एकनाथ माले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे, डॉ. कुमार शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन रुद्रवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मधुकर घुबडे यांच्या हस्ते देण्यात आले.

मागील एक वर्षापासून कोरोना काळात ज्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेऊन आरोग्य विभागाला सहकार्य केले त्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची तपासणी या शिबिराच्या माध्यमातून करण्यात आली. त्यात तहसील, पंचायत समिती, नगर परिषद पोलीस स्टेशन व कोर्टाचा समावेश केला होता.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाविषयी माहिती व्हावी म्हणून जा त्या शाळेत जाऊन आरोग्य कर्मचारी ऑनलाइनद्वारे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली व विद्यार्थ्यांच्या छोटा छोटा शस्त्रक्रियादेखील या शिबिरात करण्यात आल्या, त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले, ग्रामीण रुग्णालयात जे रुग्ण ॲडमिट आहेत त्या रुग्णांच्या नातेवाइकांची तपासणीदेखील यावेळी करण्यात आली.

या शिबिरात गरोदर मातांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात करण्यात आली. त्याचबरोबर न्यूमोकोकल काॅन्ज्युगेट व्हॅक्सिन या नवीन लस देण्यास सुरुवात करण्यात आली असून ही लस लहान बालकांना देण्यात येणार आहे. यावेळी गर्भ संस्कार शिबिर घेऊन कोरोना काळात गरोदरपणात घ्यावयाची काळजी याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी प्रस्तुती झालेल्या महिलांना किटचे वाटप करण्यात आले.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉ. प्रसाद कुलकर्णी, डाॅ. नारायण पाळणे, डॉ. कट्टे, नर्स पठाण शाहीन आदींनी परिश्रम घेतले.

220721\purusttam karva_img-20210722-wa0041_14.jpg

Web Title: Good response to Sankalp Nirogi Abhiyan; Go to the office and check the staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.