बीडमध्ये पथदिवे बंद; नागरिकांना त्रास
बीड : शहरात तीन आठवड्यांनंतर काही भागातील पथदिवे सुरू झाले. मात्र गेल्या तीन दिवसांपासून डी.पी. रोड, स्टेडियम परिसर, सुभाष रोड भागातील अनेक पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. या भागात रुग्णालय, औषधी दुकाने सुरू असतात; मात्र पथदिवे बंद असल्याने अडचणी येत आहेत.
सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी
बीड : नगर परिषदेकडून शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा अनियमितपणाने करण्यात येत आहे. शहराच्या काही भागात तीन दिवसाआड आणि तेही सात ते आठ तास, तर काही भागात बारा ते पंधरा दिवसाआड आणि तेही फक्त दीड ते दोन तास याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. शहरात होणारा पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
‘ओव्हरलोड’ वाहतूक; लहान रस्त्यांची दैना
अंबाजोगाई : शहरातील विविध उपनगरांमध्ये अनेक बांधकामे सुरू आहेत. यासाठी खडी, वीट, वाळू, घेऊन येणाऱ्या ओव्हरलोड डम्परमुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय बनली आहे. तसेच या वाहतुकीमुळे परिसरात प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्याचा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अशा वाहनांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.