निकामी ब्रेकमुळे दीड लाखाचा भुर्दंड; जागीच भरपाई देत केली तडजोड !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 12:29 AM2018-05-10T00:29:19+5:302018-05-10T00:29:19+5:30
व-हाड घेऊन निघालेल्या खाजगी बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर बेफाम बसने सहा वाहनांचे तसेच दुकानातील साहित्याचे नुकसान केले. मात्र याप्रकरणी जागीच भरपाई देऊन खाजगी बसमालकाने दीड लाख रुपये वाटून मिटवामिटवी केली. त्यामुळे एकही वाहनधारक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला नाही. खाजगी बस मालकाच्या या ‘तत्परते’मुळे वºहाडासाठी वापरलेल्या बसच्या फिटनेसबद्दल शंका उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : व-हाड घेऊन निघालेल्या खाजगी बसचे ब्रेक निकामी झाल्यानंतर बेफाम बसने सहा वाहनांचे तसेच दुकानातील साहित्याचे नुकसान केले. मात्र याप्रकरणी जागीच भरपाई देऊन खाजगी बसमालकाने दीड लाख रुपये वाटून मिटवामिटवी केली. त्यामुळे एकही वाहनधारक पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला नाही. खाजगी बस मालकाच्या या ‘तत्परते’मुळे वºहाडासाठी वापरलेल्या बसच्या फिटनेसबद्दल शंका उपस्थित होत आहे.
बीडमध्ये सोमवारी दुपारी गांधीनगर भागातून वºहाडींना घेऊन एक खाजगी बस पेठ भागातील नाळवंडी नाका येथील वळणावर आल्यानंतर ब्रेक निकामी झाले. त्यामुळे ही बस अनियंत्रितपणे एक किलोमीटरपर्यंत धावली. परिसरातील लोक व तरुणांच्या सतर्कतेमुळे जीवित हानी टळली. परंतु या बसने सहा वाहनांना धडक दिल्याने नुकसान झाले. एकाची नवी आॅटोरिक्षा होती. तर एकाची काहीच कागदपत्रे नसलेली रिक्षा होती.
इतर वाहनधारकांकडे रीतसर कागदपत्रे होती. या घटनेनंतर अंबाजोगाई येथून बस मालक बीडमध्ये पोहोचला. अवघ्या अर्धा तासातच प्रत्येकाशी चर्चा करुन जागीच भरपाईची रक्कम त्याने वाटून बस मोकळी केली. त्यामुळे पोलिसांपर्यंत नुकसानीची तक्रार कोणीही दिली नाही. या तत्परतेमुळे बसच्या फिटनेसबद्दल शंका निर्माण होत आहे.
दुसरीकडे या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात मात्र कायदेशीर पूर्तता म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सय्यद समीर सय्यद वजीर यांनी दिलेल्या फिर्यादीत ट्रॅव्हल्स् (एमएच २३ डब्ल्यू २४२४) चा चालक बाळासाहेब मुळे (रा. गंगाखेड) याने त्याच्या ताब्यातील ट्रॅव्हल्स् बस भरधाव, हयगयी व निष्काळजीपणाने चालवत अब्दुल कदीर यांच्या घरास धडक देऊन ट्रॅव्हल्स्चे अंदाजे २ लाख ८५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे नमूद केले आहे.
दुर्घटनेबरोबरच नुकसानही
वºहाड अथवा प्रवासी वाहतुकीसाठी अशी वाहने वापरताना होणारा निष्काळजीपणा तसेच आरटीओ व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष यामुळे सोमवारसारख्या घटना घडू शकतात. प्रवासी वाहतूक तसेच कार्यक्रमांसाठी खाजगी बसचा वापर करताना फिटनेसबद्दल खातरजमा करणे गरजेचे आहे. नसता दुर्घटनेबरोबरच इतर नुकसानीलाही सामोरे जावे लागते. बसच्या कागदपत्रांसह इतर बाबींची चौकशी पोलिसांनी केली की नाही याबद्दलही शंका व्यक्त होत आहे.