पोदार जम्बो किड्समध्ये आरोग्य जनजागृती शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:26 AM2020-12-26T04:26:17+5:302020-12-26T04:26:17+5:30

भारत सरकारने सुरु केलेल्या फिट इंडिया अभियानात सहभागी होत अंबाजोगाई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार जम्बो किड्स येथे ...

Health Awareness Camp at Podar Jumbo Kids | पोदार जम्बो किड्समध्ये आरोग्य जनजागृती शिबीर

पोदार जम्बो किड्समध्ये आरोग्य जनजागृती शिबीर

Next

भारत सरकारने सुरु केलेल्या फिट इंडिया अभियानात सहभागी होत अंबाजोगाई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल आणि पोदार जम्बो किड्स येथे महाराष्ट्र सरकारच्या कोविड 19 च्या काळात घ्यावयाच्या खबरदारीच्या सर्व नियमांचे पालन करीत पालक आणि शिक्षकांसाठी ''''फिट इंडिया सप्ताह'''' साजरा केला. या सप्ताहात आरोग्यविषयक जनजागृती करण्यासाठी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत शिबिराचे आयोजन केले गेले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शाळेच्या समन्वयिका डॉ. रेणू झिरमिरे-कुदळे यांनी केले. यावेळी डॉ. अनघा पाठक यांनी ''''संतुलित आहार आणि वेट लॉस'''' या विषयावर उपस्थितांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “फिटनेस म्हणजे शरीररचना, लवचिकता, चिवटपणा, सामर्थ्य आणि तग धरून ठेवण्याची क्षमता यांचा उत्तम समतोल होय. पारंपारिक, षड्रसात्मक, आपल्या भौगोलिक परिसरात उत्पादित होणारे अन्न हेच आपल्या शरीरासाठी उत्तम असते.आपण आपल्या प्रकृतीनुसार आहाराचे सेवन करावे. विरुध्द अन्न, कोल्ड्रिंक्स, जंक फूड यांचे सेवन टाळावे. व्यायाम करताना आनंद घेऊन करणे आणि त्यात सातत्य ठेवणे आवश्यक असते. याने दिवसभर उत्साह वाटतो आणि थकवा येत नाही.” याचबरोबर जेवणात मीठ आणि साखरेचे प्रमाण नगण्य ठेवल्यास शरीर निरोगी काटक राहण्यास मदत होते असेही त्या यावेळी म्हणाल्या. ''''मानसिक स्वास्थ्य आणि निरोगी जीवन'''' या विषयावर डॉ. शुभदा लोहिया यांनी पालकांशी संवाद साधताना दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत त्यांचे आजवरचे त्यांचे पेशंटसोबत आलेले काही अनुभवही कथन केले. त्या म्हणाल्या, “चिंता, स्पर्धा, भीती, कमी वयातल्या वाढत्या अपेक्षा, इत्यादी गोष्टी आपले मानसिक आरोग्य बिघडवतात. आपल्या कामाबद्दल प्रतिष्ठा वाटणे, चांगल्या कामाचे कौतुक करणे/करवून घेणे, छंद जोपासणे, स्वतःसाठी वेळ काढणे अशा मनाला आनंद देणाऱ्या आल्हाददायक गोष्टी करण्याने मनाला प्रसन्न वाटते. जेणेकरून आपण काही काळासाठी का होईना दैनंदिन ताण तणाव कमी करू शकतो मानसिकरीत्या सुदृढ राहतो. पालकांनी स्वतःमध्ये रुजलेली ''''स्पर्धा'''' मुलांमध्ये रुजवू नये. जेणेकरून बालपण केवळ आनंदीच राहील.” तसेच आपला आहार ज्याप्रमाणे शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम करतो तसेच आपले विचार मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करतात असेही त्या म्हणाल्या. म्हणूनच प्रत्येक व्यक्ती ही तिच्या आहार आणि विचारांचे प्रतिरूप असते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे प्राचार्य अजय इंगळे सर, मुख्याध्यापिका ज्योती स्वामी, प्रशासकीय अधिकारी साईनाथ लुटे, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-र्यांचे सहकार्य लाभले.

Web Title: Health Awareness Camp at Podar Jumbo Kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.