बीड जिल्ह्यातील तीन महसूल मंडळात अतिवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:13 AM2018-06-05T11:13:20+5:302018-06-05T11:13:20+5:30
जिल्ह्यातील माजलगाव, अंबाजोगाई आणि लोखंडी सावरगाव या तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.
बीड : जिल्ह्याला मान्सूनपूर्व पावसाने जोरदार तडाखा दिला. काल मध्यरात्री जिल्ह्यातील माजलगाव, अंबाजोगाई आणि लोखंडी सावरगाव या तीन महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.
जिल्ह्यातील माजलगाव महसूल मंडळात 70 मि.मी.पाऊसाची नोंद झाली आहे तर अंबाजोगाई महसूल मंडळात 70 मि.मी. तसेच याच तालुक्यातील लोखंडी सावरगाव महसूल मंडळात तब्बल 77 मि.मी.पाऊसाची नोंद झाली आहे. 63 मि.मी.पेक्षा जास्त होणारा पाऊस अतिवृष्टी मानला जातो.
याशिवाय परळी महसूल मंडळातही 42 मि.मी. माजलगाव तालुक्यातील गंगामसला महसूल मंडळात 40 मि.मी. तर दिंद्रुड महसूल मंडळांतही 63 मि.मी.पाऊस झाल्याची नोंद पर्जन्यमापकावर झाली आहे.
तालुकानिहाय पाऊस:-
तालुका - पावसाचे प्रमाण ....मि.मी.
बीड- 7.3
पाटोदा-5.5,
गेवराई-3.3,
अंबाजोगाई-34.2,
माजलगाव-37.3,
केज-17.1,
धारुर-25 ,
परळी 12.08