बीडमध्ये हिंदीचा पेपर; कडा, पाडळीत ११ विद्यार्थी रस्टिकेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:17 AM2018-02-23T01:17:05+5:302018-02-23T01:17:11+5:30
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने बुधवारपासून सुरु झालेल्या बारावी परीक्षेत दुसºया दिवशी द्वितीय भाषा हिंदीच्या परीक्षेतही कॉप्यांचा वापर विद्यार्थ्यांनी केल्याचे दिसून आले. आष्टी तालुक्यातील कडा आणि शिरुर कासार येथील पाडळी येथील केंद्रांवर भरारी पथकांनी अचानक तपासणी करुन कॉपी व परीक्षेदरम्यान प्रतिबंध असलेले गैरसाहित्य आढळलेल्या ११ परीक्षार्थींवर रेस्टीकेटची कारवाई करण्यात आली.
बीड : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने बुधवारपासून सुरु झालेल्या बारावी परीक्षेत दुसºया दिवशी द्वितीय भाषा हिंदीच्या परीक्षेतही कॉप्यांचा वापर विद्यार्थ्यांनी केल्याचे दिसून आले. आष्टी तालुक्यातील कडा आणि शिरुर कासार येथील पाडळी येथील केंद्रांवर भरारी पथकांनी अचानक तपासणी करुन कॉपी व परीक्षेदरम्यान प्रतिबंध असलेले गैरसाहित्य आढळलेल्या ११ परीक्षार्थींवर रेस्टीकेटची कारवाई करण्यात आली.
गुरुवारी माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी एस. पी. जयस्वाल, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मनोज धस, मोहन काकडे यांच्या पथकाने कडा येथील मोतीलाल कोठारी विद्यालय या परीक्षा केंद्रावर तपासणी केली. या केंद्रात ३५२ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. परीक्षेदरम्यान कॉपी करताना आढळल्याने ५ परीक्षार्थींवर कारवाई करण्यात आली.
तसेच शिरुर कासार तालुक्यातील पाडळी येथील पाडळी हायस्कुल परीक्षा केंद्रावर निरंतर विभागाचे शिक्षणाधिकारी राजेश गायकवाड, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भगवानराव सोनवणे, तुकाराम ठाकूर, केंद्रप्रमुख सुनंदा घुले यांच्या भरारी पथकाने तपासणी केली असता कॉपी बाळगणाºया ६ विद्यार्थ्यांवर रेस्टीकेटची कारवाई केली. या ठिकाणी गाईड, पुस्तकांच्या कॉपी केल्याचे दिसून आले.
परीक्षेत चक्क मोबाईल, हेडफोन
कडा येथील केंद्रात एका विद्यार्थ्याकडे चक्क वर्गात भ्रमणध्वनी आढळून आला, अन्य एकाकडे हेडफोन सापडले. उर्वरित तीन विद्यार्थ्यांकडे हिंदी विषयाच्या मायक्रोकॉपी सापडल्या. पाचही जणांवर बार्डाच्या नियमानुसार कारवाई झाली. संबंधित वर्गावर पर्यवेक्षक म्हणून काम पाहणाºया शिक्षकास यापुढे बोर्डाचे कोणतेही काम देण्यात येऊ नये असा शेरा भरारी पथकाने दिला आहे.
इतरत्र कारवाई नाही
शिक्षण विभागाचे सहा भरारी पथक परीक्षा केंद्रांवर भेटी देत आहेत.
दोन दिवसात भरारी पथकाच्या कारवाया बीड, शिरुर, आष्टी तालुक्यातच झाल्या आहे.
अन्य तालुक्यांमध्येही पथकाला भरारी मारावी लागणार आहे.