एक पाऊस झाला असता तरी शेतकरी झाला असता मालामाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 02:52 PM2018-11-07T14:52:22+5:302018-11-07T15:00:30+5:30

खरिपाच्या हंगामात पोटभरून एक पाऊस झाला असता तर शेतकरी उत्पन्न हातात पडून मालामाल झाला असता.

If there may have been a rain; a farmer becomes a milliner | एक पाऊस झाला असता तरी शेतकरी झाला असता मालामाल 

एक पाऊस झाला असता तरी शेतकरी झाला असता मालामाल 

Next
ठळक मुद्दे एका पावसा अभावी शेतकरी कंगाल  तुरीच्या तुऱ्हाट्या आणि कापसाचे झाले खराटे

शिरुर कासार (बीड ) : आतापर्यत कधी अनुभवले नाही आणि ऐकलेही नाही असा प्रसंग तालुक्यातील शेतकऱ्यांसह सर्वांनाच अनुभवण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. 

खरिपाच्या हंगामात पोटभरून एक पाऊस झाला असता तर शेतकरी उत्पन्न हातात पडून मालामाल झाला असता. मात्र, तसे न होता शेतकरी पुरता नागवला गेला. पिके गेली, चारा नाही आणि पाणीही नाही अशा उजाड झालेल्या वाळवंटात गुजराण कशी करायची याची भ्रांत. सुखाची झोप येऊ देईना, सरकार मायबाप काय दिलासा देतय यावर सारं आता अवलंबून आहे.

साखर आणि गूळ पिकवणारा तालुका आता पाण्याअभावी पांढऱ्या सोन्याकडे झुकला होता. गेल्या काही वर्षांपासून कापूस आधारभूत मानला जायचा पण त्यालाही आता उतरणी सुरु झाली आणि यावर्षी तर खर्च करुन शेतकरी फक्त तुरीच्या तुराट्या आणि कापसाच्या खराट्याचा मालक बनला. झालेला खर्च आणि अपेक्षित उत्पन्न यापोटी अब्जाधिश होऊ पहात असलेला शेतकरी हातात कटोरी घेऊन सरकारकडे मदतीची याचना करु लागलाय. बळीराजाच बलहीन झाल्याने विकासाचा कणाच मोडू पहातोय.

तालूक्याचे भौगोलिक क्षेत्र ६५०१८.४ हेक्टर असून, त्यात पेरणी क्षेत्र ५५३३९.६ हेक्टर आहे. या वर्षी खरीपात २७४३१ हेक्टरवर कापूस लागवड केली होती. उगवणीत व पुढे मशागतीच्या जोरावर चित्र चांगले दिसत होते. कापूस उत्पादनाचा अंदाज बांधत बिचारा शेतकरी संध्याकाळी चतकोर भाकरी जास्त खात होता. मात्र, हे सारे मृगजळ ठरले आणि पावसाने होत्याचे नव्हते केले. हेक्टरी किमान १५ ते ३० क्विंटल उतारा होणारा कापसाचा काटा २ ते ३ क्विंटलवर अडकला आणि कापसाचा शेवट झाला. आता आहे तो भाव जरी अपेक्षित उत्पन्न होऊन मिळाले असते तरी शेतकऱ्याचे हात सोन्यासारखे पिवळे झाले असते. त्याच्या हाताला कोळशाच रंग लागला गेला.

कापसासारखीच इतर पिकांची स्थिती
६३९२ हेक्टरवर तुरीचा पेरा झाला खरा; मात्र तुरीच्या फुलांचा पिवळा रंग येताच पावसाअभावी फुलाला शेंगा न लागताच फुलासहीत पानेही वाळून खाली पडली व तुराट्याच हाती आल्या. मूग घुगऱ्यापुरताही हातात आला नाही. उडीद हातचे गेले. ८८५ हेक्टरवरच्या भुईमुगाचा पालाच झाला. सोयाबीन मुगासारखे बारीक जन्मले म्हणून भावात त्याने मार खाल्ला.१०५ हेक्टरवर तर चटणी पुरतेही कारळ झाली नाही. हा सारा हिशेब आकडेवारीत मांडला तर अब्जाधिश म्हणणे गैर ठरणार नाही. एका पावसाने शेतकऱ्यांचा स्वप्नभंग झाला हेच खरे म्हणावे लागेल.

Web Title: If there may have been a rain; a farmer becomes a milliner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.