शासकीय कामात अडथळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:31 AM2021-03-25T04:31:02+5:302021-03-25T04:31:02+5:30

अशोक रायभान शिरसाट ( रा. सादोळा ता. माजलगाव जि. बीड ) यांच्याविरुद्ध दिनांक २१ जुलै २०१८ रोजी माजलगाव ग्रामीण ...

Innocent acquitted of obstruction of official business | शासकीय कामात अडथळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

शासकीय कामात अडथळ्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

Next

अशोक रायभान शिरसाट ( रा. सादोळा ता. माजलगाव जि. बीड ) यांच्याविरुद्ध दिनांक २१ जुलै २०१८ रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.न.२०७ /२०१८ नुसार कलम ३५३, ३३२, ५०४,५०६ भा.द.वि प्रमाणे फिर्यादी परशुराम बापूराव राऊत ( रा. सादोळा ) ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी यांना शिवीगाळ करून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय माजलगाव येथे दाखल होऊन त्यामध्ये सरकार पक्षाकडून सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. दरम्यान, आरोपीच्या वतीने केलेला बचाव युक्तिवाद ग्राह्य धरून उपरोक्त गुन्ह्यातून आरोपीची जिल्हा न्यायाधीश-१ अरविंद वाघमारे यांनी २० मार्च २०२१ रोजी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने ॲड. अजय. डी. साखरे यांनी काम पाहिले व त्यांना ॲड. वाय. बी मुंडे यांनी मार्गदर्शन केले. ॲड. सुरेंद्रकुमार साळवे व ॲड. पवनकुमार साळवे यांनी त्यांना सहकार्य केले.

Web Title: Innocent acquitted of obstruction of official business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.