जय हो! कीर्तन वेळेवर व्हावे म्हणून महाराजांचा चक्क हेलिकॉप्टर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 06:46 PM2023-01-06T18:46:55+5:302023-01-06T18:48:01+5:30

राम कथाकार हभप समाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा चालू असून कथेपूर्वी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढून त्यांना आदराने रामकथेच्या व्यासपीठावर आणण्यात आल्या नंतर रामकथेला प्रारंभ झाला.

Jai Ho! Maharaj's helicopter journey so that the kirtan was done on time | जय हो! कीर्तन वेळेवर व्हावे म्हणून महाराजांचा चक्क हेलिकॉप्टर प्रवास

जय हो! कीर्तन वेळेवर व्हावे म्हणून महाराजांचा चक्क हेलिकॉप्टर प्रवास

Next

- मधुकर सिरसट 
केज (बीड) :
येथील रामकृष्ण परमहंस परिवाराचे संस्थापक वासुदेव खंदारे गुरुजी यांचे शिष्य समाधान महाराज शर्मा यांची सांगलीत रामकथा सुरु आहे. येथे भाविकांनी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढली होती. दरम्यान, गुरुवारी पुण्यात कीर्तनासाठी येण्यास उशीर होत असल्याने महाराजांसाठी आयोजकांनी चक्क हेलिकॉप्टर धाडले. महाराजांनी हेलिकॉप्टर प्रवास करत वेळेवर पोहचत वाघोली येथील महोत्सवात कीर्तन सादर केले. मात्र, हेलिकॉप्टर प्रवासामुळे समाधान महाराज शर्मा हे चांगलेच चर्चेत आले आहेत.

केज तालुक्यातील कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सध्या सांगली येथे रामकथा सुरू आहे. त्यांना पुण्यातील वाघोली परिसरातील सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवात ही कीर्तन सेवा सादर करण्याचा आग्रह भाविकांनी केला होता. परंतु सांगली येथील रामकथा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता संपली. त्यानंतर खाजगी वाहनाने 247 किमी अंतरावर वाघोली येथे जाण्यासाठी 5 तास 17 मिनिटे लागणार असल्यामुळे वेळेवर येणे  होणार नसल्याचा निरोपही महाराजांनी संयोजकांना दिला होता. परंतु वाघोली, पुणे येथील कीर्तन महोत्सवाचे  आयोजक संताराम कटके व मित्र परिवार भाविकांनी हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. आणि सांगली ते वाघोली हे अंतर अवघ्या 45 मिनिटात महाराजांनी पार केले. हेलिकॉप्टर मधून उतरताच महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले.

भाविकांचा पुढाकार
हभप समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनचा लाभ भाविकांना मिळावा यासाठी कीर्तन महोत्सवाचे आयोजक शांताराम खटके, व  हरिदास जोगदंड, रोहीदास कटके, सोमनाथ कटके, सोमनाथ गावडे , गणेश हारगुडे यांनी पुढाकार घेतला.

हत्तीवरून मिरवणूक
समाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा चालू असून कथेपूर्वी त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आदराने रामकथेच्या व्यासपीठावर आणण्यात आले. 

Web Title: Jai Ho! Maharaj's helicopter journey so that the kirtan was done on time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.