बीड : शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डॉ. नामदेव सानप, उपसरपंच सुरेश जाधव, अनंत सानप, सुभाष म्हेत्रे, दत्ता म्हेत्रे, आसाराम नेमाने, राहुल म्हेत्रे आदी उपस्थित होते.
चौसाळ्यात व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी
बीड : तालुक्यातील चौसाळा येथे व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. निगेटिव्ह आल्यानंतर व्यापाऱ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच मधुकर तोडकर, विकास नाईकवाडे, डॉ. कैलास खाकरे, बी. के. जायभाये, संतोष खाकरे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी रेश्मा कळसकर, प्रसाद देशमुख आदी उपस्थित होते.
बर्दापूर प्रा. आ. केंद्रात लसीकरण सुरू
बीड : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरण प्रारंभ वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल हडबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भगवान मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहा इंगे, डॉ. धनेश्वर मेनकुदळे, लक्ष्मीकांत तपसे, कविता रेड्डी, चेतन बुरांडे, गौस आदी उपस्थित होते.
सरकारने समस्या जाणून घ्याव्यात
बीड : माल वाहतूक करणाऱ्या चालकांची समस्या राज्य सरकारने जाणून घ्यावी. चालकास पोस्टाद्वारे मतदान, टोलनाक्यावर झोपण्याची सोय, स्वतंत्र महामंडळाची सोय, आदी व्यवस्था कराव्यात, अशी मागणी संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष पठाण इमरान यांनी केली आहे.