येथे कलाविष्कार प्रतिष्ठान आयोजित बालग्राम परिवार, सहारा अनाथालयाच्या भव्य प्रांगणातील गौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शोभा देवी महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा गिरीका पंडित तर छत्रपती मल्टिस्टेटचे चेअरमन संतोष भंडारी, उपशिक्षणाधिकारी प्रवीण काळम पाटील, सहारा अनाथालयाचे संचालक संतोष गर्जे, गंगाधर काळकुटे, मधुकर तौर, डी.पी. शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाहक दिनकर शिंदे, आशा शिंदे, नारायण झेंडेकर, एकनाथ लाड, शिवप्रसाद आडेळे, गणेश मिटकर, संतोष कोठेकर, सचिन पुणेकर, डॉ.गणेश कोठेकर, प्रतीक कांबळे, रोहित चव्हाण, सीता महासाहेब, ज्योती झेंडेकर, स्वाती कोठेकर, डॉ.नितीशा कोठेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गेवराई भूषण पुरस्काराने ॲड.कमलाकर देशमुख, प्रीती संतोष गर्जे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय कदम, डॉ.राजेंद्र आंधळे, डॉ.रचना शेळके, पोलीस उपनिरीक्षक संदीप काळे, सहायक पोलीस निरीक्षक मनीषा जोगदंड, सुभाष सुतार, सुनील पोपळे, विनोद नरसाळे तर जगन्नाथ जाधव, धर्मराज करपे यांना गेवराई रत्न पुरस्कार देण्यात आले. पुढे बोलताना डॉ.दीपा क्षीरसागर म्हणाल्या की, सामान्य माणसाला मायेची सावली देणाऱ्या गिरीका पंडित यांचे मोठे पाठबळ असल्याने, कलाविष्कार प्रतिष्ठानचे कार्यवाह दिनकर शिंदे व आशा शिंदे या पतीपत्नीसह त्यांचे सर्व सहकारी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत आहेत. गेवराई हे कलेचे माहेरघर असले, तरी कलाविष्कार प्रतिष्ठान'च्या माध्यमातून तालुका आणि बीड जिल्ह्यातील सांस्कृतिक चळवळीला मोठी चालना मिळाली असल्याचे गौरवोद्गार डॉ दीपा क्षिरसागर यांनी काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे कार्यवाह दिनकर शिंदे यांनी तर सूत्रसंचालन संतोष कोठेकर यांनी मानले.