बीडमध्ये मेकॅनिकवर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 01:01 AM2018-01-10T01:01:03+5:302018-01-10T01:01:10+5:30
किरकोळ कारणावरून दुचाकी शोरूममधील एका मेकॅनिकवर साज जणांनी चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोंढा टी पॉर्इंटवर घडली. हल्लेखोर शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : किरकोळ कारणावरून दुचाकी शोरूममधील एका मेकॅनिकवर साज जणांनी चाकूने हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास मोंढा टी पॉर्इंटवर घडली. हल्लेखोर शोरूमच्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, जखमी तरूणावर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या हात आणि चेहºयावर गंभीर वार झालेले आहेत. निखिल नागनाथ सपकाळ (१९ रा.नाळवंडी नाका, बीड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. रविवारी दुपारी तो बहिणीला भेटण्यासाठी शाहूनगरमध्ये जात होता. याचवेळी त्याच्या दुचाकीचा दुसºया दुचाकीला धक्का लागला. यामध्ये त्यांच्यात बाचाबाची झाली.
हे प्रकरण तात्पुरते मिटले होते. परंतु मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास साधारण पाच ते सात तरूण निखिल काम करत असलेल्या दुचाकी शोरूममध्ये आले. त्याला बोलण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावले. बोलत असतानाच त्याच्यावर या लोकांना चाकूने हल्ला केला. काही जणांनी त्याला लाथाबुक्याने मारहाण केली. यामध्ये त्याच्या चेहºयावर आणि हाताला गंभीर जखम झाली आहे. जिल्हा रूग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले, असून तो पूर्णत: भयभीत झालेला होता. ही सर्व माहिती निखिलच्या नातेवाईकांनी दिली. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणाची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेने बीड शहरात सर्वत्र खळबळ उडाली आहे.
चार मिनिटांचा थरार
शोरूममध्ये निखिलवर हल्ला होत असताना मदतीसाठी कोणीच धावले नाही. ५.५२ ते ५.५४ असे चार मिनीटे त्याला मारहाण केली जात होती.
शेवटी दुरवर असलेल्या काही लोकांनी धाव घेत त्याची सुटका केली. त्यानंतर हल्लेखोर शोरूमच्या बाजूच्या गल्लीतून पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.