कुंडलिक पाणी पुरवठा योजनेचे काम; कुलूप ठोकण्याचा शिवसेनेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:07+5:302021-02-12T04:31:07+5:30
आक्रमक शिवसैनिक पाहून मुख्याधिकारी पाचच मिनिटात कार्यालयात हजर झाले. धारूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शहराला उपळी येथील कुंडलिका ...
आक्रमक शिवसैनिक पाहून मुख्याधिकारी पाचच मिनिटात कार्यालयात हजर झाले. धारूर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी शहराला उपळी येथील कुंडलिका धरणावरून २२ कोटी रुपयांची सुजल निर्माण योजनेतून पाणी पुरवठा योजना दहा वर्षांपूर्वी मंजूर झाली. मात्र, नगर परिषदेच्या उदासिनतेमुळे हे काम अर्धवट अवस्थेत रखडले असून, ११ कोटी रुपये निधी नगर परिषदकडे पडून असताना तांत्रिक बाबीमुळे हे काम रखडले आहे. शहराचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणाऱ्या योजनेचे काम तत्काळ सुरू करावे, या मागणीचे निवेदन देण्यासाठी शिवसैनिक नगरपरिषद कार्यालयात गेले गेले होते. बारा वाजले तरी मुख्याधिकारी नेहमीप्रमाणे गैरहजर होते. चौकशी केली तर त्यांनी वडवणीचा पदभार असल्याने तिकडे असल्याचे सांगून कार्यालय अधीक्षक यांच्याकडे निवेदन देण्याचे सुचवले. मात्र शिवसैनिक आक्रमक झाले व हा प्रश्न गंभीर असल्याने मुख्याधिकारी यांच्या खुर्चीला निवेदन दिले. शिवसैनिकांची आक्रमकता पाहून मुख्याधिकारी पाचच मिनिटात कार्यालयात हजर झाले.
शिवसैनिकांनी कुंडलिका पाणी पुरवठा योजनेचे रखडलेले काम तत्काळ सुरू करा, नाहीतर १५ फेब्रुवारीला नगर परिषद कार्यालयास शिवसेना कुलूप ठोकेल, असा इशारा दिला. यावेळी तालुकाप्रमुख नारायण कुरुंद, विनायक ढगे, शहरप्रमुख बंडू शिनगारे, तालुका संघटक राजकुमार शेटे, उपतालुका प्रमुख बंडू बप्पा सावंत, उपशहर प्रमुख नितीन सद्दिवाल, सुनील भांबरेसह शिवसैनिक उपस्थित होते.