अँटिजन तपासणी किटचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:43+5:302021-03-16T04:33:43+5:30

दिंद्रुड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोमवारी दिंद्रुड ग्रामपंचायत हद्दीतील १७३ व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी ...

Lack of antigen testing kits | अँटिजन तपासणी किटचा तुटवडा

अँटिजन तपासणी किटचा तुटवडा

Next

दिंद्रुड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सोमवारी दिंद्रुड ग्रामपंचायत हद्दीतील १७३ व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी करण्यात आली, तर तपासणी किट कमी पडल्याने उर्वरित व्यावसायिकांना तपासणी न करता माघारी फिरावे लागले.

सर्व व्यावसायिकांनी अँटिजन तपासणी करून घेण्याचे आवाहन सरपंच अजय कोमटवार व आरोग्य विभागाने केले होते. या आवाहनाला व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला. पात्रुड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दिंद्रुड येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी १७३ जणांची अँटिजन तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोघे कोरोनाबाधित, तर १७१ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दिंद्रुड हे ४०० ते ५०० व्यावसायिकांचे गाव असून लवकरात लवकर तपासणी शिबिराचे आयोजन करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

===Photopath===

150321\sanotsh swami_img-20210315-wa0056_14.jpg

Web Title: Lack of antigen testing kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.