निमगाव चोभा येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:45+5:302021-04-10T04:32:45+5:30

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत निमगाव चोभा येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रावर ४५ वर्षांच्या पुढील ग्रामस्थांना ...

Launch of Kovid Preventive Vaccination at Nimgaon Chobha. | निमगाव चोभा येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ.

निमगाव चोभा येथे कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा शुभारंभ.

Next

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत निमगाव चोभा येथील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रावर ४५ वर्षांच्या पुढील ग्रामस्थांना ८ एप्रिल रोजी कोविड - १९चे लसीकरण करण्यात आले. सरपंच सरस्वती मधुकर गिऱ्हे यांच्या हस्ते लसीकरणाचे उद्घाटन झाले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश झगडे, भाऊसाहेब गाडे, मधुकर गिऱ्हे, सुनील गिऱ्हे, राम थेटे, अनिल दुधावडे आणि अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. या लसीकरण मोहिमेसाठी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील पांचाळ , डॉ. सुनील पाटील, चितळे, गावातील आशा मीना आजबे, मंगल पवळ, मंगलबाई गाडे व उपकेंद्र कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मधुकर गिऱ्हे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, कडा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अरबे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे सत्र सुरळीतपणे पार पडले. या मोहिमेंतर्गत १०१ लाभार्थ्यांना कोविड लस देण्यात आली. माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश झगडे. यांनी स्वतः लस घेऊन निमगाव चोभा येथील ग्रामस्थांना लस घेण्यासाठी आवाहन केले.

पहिल्याच दिवशी निमगाव चोभा येथील ग्रामस्थांनी लसीकरण करण्यासाठी उपकेंद्रावर गर्दी केली होती. पहिल्या दिवशी ४० महिला व ६१ पुरूषांना लस देण्यात आल्याचे डॉ. स्वप्नील पांचाळ यांनी सांगितले.

Web Title: Launch of Kovid Preventive Vaccination at Nimgaon Chobha.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.