अंबाजोगाईत कायदा, सुव्यवस्था ढासळली - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:29 AM2021-03-15T04:29:19+5:302021-03-15T04:29:19+5:30

अविनाश मुडेगांवकर अंबाजोगाई : शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. दहा दिवसांत ...

Law and order has deteriorated in Ambajogai - A | अंबाजोगाईत कायदा, सुव्यवस्था ढासळली - A

अंबाजोगाईत कायदा, सुव्यवस्था ढासळली - A

Next

अविनाश मुडेगांवकर

अंबाजोगाई : शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याने कायदा व सुव्यवस्था ढासळत चालली आहे. दहा दिवसांत खुनाच्या दोन घटना याशिवाय चोऱ्या, मारामारी व अवैध व्यवसाय अशा विविध समस्यांनी शहराला ग्रासले आहे. वाढत्या गुन्हेगारीमुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. गुन्हेगारीवर वचक बसविण्यास पोलिसांना सध्या तरी अपयश आले आहे.

मराठवाड्याचे पुणे व शांत शहर म्हणून अंबाजोगाईचा लौकिक सर्वत्र आहे. सांस्कृतिक व साहित्यिक वारसा जोपासणारी अंबाजोगाई पर्यटकांचे आकर्षण ठरलेले आहे. शिक्षणाचे माहेरघर म्हणून आजही येथे शिक्षणासाठी हजारो विद्यार्थी बाहेरगावाहून येऊन अंबाजोगाईत राहतात. मात्र, शहराचे रूप दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीमुळे पालटले जात आहे. गेल्या दहा दिवसांत अंबाजोगाईत खुनाच्या दोन घटना घडल्या. मोरेवाडी येथे भरवस्तीत २० वर्षीय युवकाची हत्या झाली. तर दुसरी घटना चार दिवसांपूर्वी बसस्थानकापासून हाकेच्या अंतरावर घडली. याशिवाय शहरात मारामाऱ्या, गुंडगिरी व गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. शहरात अप्पर पोलीस अधीक्षक व पोलीस उपअधीक्षक हे दोन मुख्य कार्यालये आहेत. शिवाय शहर व ग्रामीण अशी दोन पोलीस ठाणी गुन्हेगारी नियंत्रणासाठी कार्यरत आहेत. असे असतांनाही कायदा व सुव्यवस्था ढासळली जात आहे.

शहरात बेशिस्त वाहतुकीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या वाहतुकीवर पोलिसांचे कसल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याने लहानमोठे अपघात सातत्याने घडत आहेत. सावकारी फोफावली

शहरात सावकारी व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अनेक तरुणांना पैशाचे आमिष दाखवून भल्या मोठ्या व्याजाने रक्कम दिली जाते. या रकमेची वसुली करण्यासाठी होणारी भांडणे हे तर अंबाजोगाईत नित्याचीच बाब ठरली आहे.

शहरातील मंडीबाजार,बसस्थानक परिसर या महत्त्वाच्या ठिकाणी वाहने रस्त्यावर पार्किंंग करून युवकांचे घोळके रस्त्याच्या बाजूला उभे असतात. अनेकदा महिलांची छेडछाड, विनयभंग अशा बाबी घडूनही याकडे पोलीस प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष शहरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण करीत आहे.

पोलिसांचा गुन्हेगारीवर वचक न राहिल्याने गल्लीबोळात छोटेमोठे दादागिरी करणारे डॉन निर्माण होत आहेत. अशा डॉनचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने त्याचा त्रासही परिसरातील रहिवाशांना होतो. मात्र, अशा गोष्टींकडे होत असलेली डोळेझाक वाढत्या गुन्हेगारीला खतपाणी घालत आहेत. शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

अंबाजोगाई शहराची कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस विभागाकडून ठोस उपाययोजना करत आहोत. - सुनील जायभाये, पोलीस उपअधीक्षक, अंबाजोगाई.

Web Title: Law and order has deteriorated in Ambajogai - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.