परळीत वीजनिर्मिती घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 01:09 AM2018-08-24T01:09:03+5:302018-08-24T01:10:18+5:30

मराठवाड्याचे भूषण असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील नवीन २५० मेगावॅट क्षमतेच्या प्रत्येकी तीन संचापैकी दोन संच सुरू असून बुधवारी सायंकाळी या संचातून ४३७ मेगावॅट विजेचे उत्पादन सुरू होते. तर जुन्या परळीत औष्णिक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेचे तीन संच तीन वर्षांपासून बंद आहेत.

Less electricity generation in Parli | परळीत वीजनिर्मिती घटली

परळीत वीजनिर्मिती घटली

Next
ठळक मुद्देऔष्णिक वीज निर्मिती केंद्र : रोजगारासह बाजारातील उलाढालीवर परिणाम; एक हजार कामगारांचे स्थलांतर

संजय खाकरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : मराठवाड्याचे भूषण असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील नवीन २५० मेगावॅट क्षमतेच्या प्रत्येकी तीन संचापैकी दोन संच सुरू असून बुधवारी सायंकाळी या संचातून ४३७ मेगावॅट विजेचे उत्पादन सुरू होते. तर जुन्या परळीत औष्णिक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेचे तीन संच तीन वर्षांपासून बंद आहेत. वीज निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने परळीच्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. जवळपास एक हजार कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली. या कामगारांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, औरंगाबाद, लातूर येथे स्थलांतर करावे लागले आहे. वीज निर्मिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न झाले तर शहराचा व्यापार उदीम भरभराटीला येऊ शकतो.
जुन्या परळीत औष्णिक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट क्षमतेचे ३, ४, ५ क्रमांकाचे हे तीन संच तीन वर्षांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या तीन संचाची वीज निर्मिती थांबलेली असून त्याचा परळीच्या आर्थिक उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. येथील जुन्या परळी औष्णिक विद्युत केद्रांत काम करणाऱ्या एक हजार कामगारांवर बेकारीची कुºहाड कोसळली आहे. तसेच कंत्राटदार व साहित्य पुरवठादार अशा जवळपास शंभर जणांना संच बंदचा मोठा फटका बसला आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रात २५० मेगावॅट क्षमतेचे ६, ७ व ८ क्रमांकाचे तीन संच आहेत. प्रत्येक संचाची स्थापित क्षमता २५० मेगावॅट आहे. परंतु तीनपैकी दोनच संच सुरू असल्याने बुधवारी सायंकाळी या दोन संचातून ४३७ मेगावॅट वीज निर्मिती सुरू होती. बुधवारी सायंकाळी ३१३ मॅगावॅट वीजेची तुट भासली, बंद असलेला २५० मेगावॅट संच पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याचे परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंता कार्यालयातून सांगण्यात आले. एका संचाची दुरुस्ती सुरू आहे. त्यामुळे या संचातून वीज निर्मिती होऊ शकत नाही.
हा संच कार्यान्वित झाल्यास त्यातून वीज निर्मिती सुरु होईल व वीजेचे उत्पादन वाढेल. बुधवारी संच क्र. ७ व ८ हे दोन संच चालु होते. तर संच क्र.६ हा बंद होता.
परळी तालुक्यातील दाऊतपुर, दादाहारी वडगाव, संगम, लोणी परिसरातील २००७ मध्ये नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्राच्या संचाची उभारणी करण्यात आली. हा ६ क्रमांकाचा संच आहे. तर २०१० मध्ये संच क्र. ७ ची उभारणी झाली. संच क्र. ८ हा २०१६ मध्ये उभारण्यात आला. हे तिन्ही संच सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून करोडो रूपये खर्च करून हे तीन संच उभारण्यात आले आहेत.
७०-७१ पासून सोन्याचा धूर : २०१५-१६ मध्ये दुष्काळाचा फटका
१९७० मध्ये परळी शहराजवळ ३० मेगावॅट क्षमतेचा पहिला संच उभारण्यात आला. त्यानंतर १९७१ मध्ये ३० मेॅगावॅटचा दुसरा संच उभारण्यात आला. या दोन संचामुळे परळी शहराचे रूपडेच पालटून गेले. या प्रकल्पामुळे शहरात आर्थिक सुबत्ता आली. ऊर्जा क्षेत्रात काम करणाºया विविध कंपन्या संच उभारणीसाठी परळीत आल्या. परळी व परिसरातील बेरोजगारांना या कंपन्यात व नंतर संचामध्ये काम मिळाले. प्रशिक्षित व अप्रशिक्षित, सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळाले. यातून अनेकांना स्वालंबी होता आले. अधिकारी, कर्मचारी आल्याने परळीची बाजार पेठ सुधारली, अनेक जण व्यावसायिक झाले. परळी औष्णिक विद्युत केंद्रामुळे कंत्राटदार व विविध साहित्य पुरवणारे पुरवठादार निर्माण झाले. त्यांच्या व्यवसायाला सुकाळ आला. तर विद्युत केंद्रातील राखेच्या पुरवठ्याने अनेकजण गब्बर झाले. त्यानंतर १९७९, १९८० व १९८१ या तीन वर्षात २१० मेगावॅट क्षमतेच्या उभारलेल्या तीन संचामुळे परळीच्या बाजारपेठेत उलाढाल वाढली.
२०१५-१६ मध्ये दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाल्याने परळी औष्णिक विद्युत केंद्राला वीज निर्मितीसाठी पुरवठा करण्यात येणाºया खडका बंधाºयात व मुदगलच्या बंधाºयात पाण्याचा ठणठणाट निर्माण झाला.
पुरेशा पाण्याअभावी ३, ४ आणि ५ क्रमांकाचे संच बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने घेतला. हे तीन संच बंद झाल्यामुळे तीन संचात काम करणाºया ९०० कामगारांना घरी जावे लागले. तर येथील अधिकारी, कर्मचाºयांच्या विदर्भातील व नाशिक येथील औष्णिक विद्युत केंद्रात बदल्या झाल्या.
आजही हे तीन संच बंद अवस्थेत आहेत. यातील २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन हा कायमस्वरूपी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.
तीन वर्षांपासून बंद असलेले क्रमांक ४ व ५ हे दोन्ही संच पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. यास परळी औष्णिक विद्युत केंद्रास मुख्य अभियंत्यांनी दुजोरा दिला आहे.
उत्पादन खर्चाचे कारण
उत्पादन खर्च जास्त येत असल्याने राज्यातील अनेक जुने संच बंद करण्याचा महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीने निर्णय घेतला. त्यात परळीच्या जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील संचाचाही समावेश होता. वीज मेरिट आॅर्डर डिस्पॅच या कारणावरु न जुने संच बंद ठेवण्यात आले आहेत.
नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्राला सध्या सोनपेठ तालुक्यातील खडका बंधाºयातून पाणी पुरवठा पाईपलाईनद्वारे केला जातो. सध्या पाण्याचा प्रश्न नाही.
बंद संचाच्या भंगाराला ग्राहक नाही
जुन्या परळी औष्णिक विद्युत केद्रातील ३० मॅगावॅट क्षमतेचे दोन संच अनेक वर्षांपुर्वी बंद ठेवलेले आहेत. या दोन्ही संचाच्या साहित्याची विक्री करण्यासाठी वर्तमानपत्रातून निविदा सुचनाही प्रसिध्द झाल्या. परंतु हे दोन संच अद्याप विक्री झालेले नसल्याची माहिती आहे.

Web Title: Less electricity generation in Parli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.