मुस्लीम आरक्षणासाठी वर्षावर पाठवली पत्रं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:24 AM2021-06-18T04:24:25+5:302021-06-18T04:24:25+5:30
बीड : भारतीय म्हणून मुख्य प्रवाहात येण्याचा आणि राष्ट्राच्या प्रगतीत भूमिका देण्याचा मुस्लीम समाजाचा हक्क आहे. यासाठी आरक्षण देऊन ...
बीड : भारतीय म्हणून मुख्य प्रवाहात येण्याचा आणि राष्ट्राच्या प्रगतीत भूमिका देण्याचा मुस्लीम समाजाचा हक्क आहे. यासाठी आरक्षण देऊन आधार देण्याची गरज असल्याचे शाहेद पटेल यांनी सांगितले. पटेल फाउंडेशनमार्फत सरकारला पत्र पाठवण्याची मोहीम हाती घेतली आहे, असे ते म्हणाले. आघाडी सरकार पुरोगामी विचाराचे सरकार असून, मुस्लीम युवकांच्या भविष्यासाठी आरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
मुस्लीम समाजातील युवकांचा शैक्षणिक व सरकारी नोकरीमधील सहभाग अत्यल्प आहे. त्यामुळे समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. जेणेकरून राष्ट्रहितामध्ये काम करण्याची संधी समाजातील युवकांना मिळेल व समाजाच्या मुख्यप्रवाहात येण्यास मदत होईल. या महाविकास आघाडी सरकारने या मागणीचा विचार करून समाजाला न्याय द्यावा, अशी मागणीदेखील या पत्र आंदोलनामधून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील मांजरसुबा, नेकनूर, लिंबागणेश, माहडूळा, चंकलबा, लिंबारुई, हिंगणी हवेली, पेंडगाव, माळापुरी , बीड शहर, वडवणी, परळी ,माजलगाव यांसह विविध गावांमधून मुस्लिमांना आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पत्रव्यवहार करण्यात आला आहे.
मुस्लीम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची मागणी आहे. दरम्यान, याची ही सुरुवात असून, पुढील काळात मागणी मान्य होईपर्यंत विविध माध्यमातून लढा दिला जाणार आहे.
शाहेद पटेल, सामाजिक कार्यकर्ते.
===Photopath===
170621\17_2_bed_15_17062021_14.jpg
===Caption===
पटेल फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवताना मुस्ली समाजातील युवक दिसत आहेत.