बीडमध्ये महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:29 AM2021-03-14T04:29:56+5:302021-03-14T04:29:56+5:30
बीड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बीडच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात महासमृद्धी महिला सक्षमीकरण ...
बीड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बीडच्या वतीने पंचायत समिती कार्यालयात महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानास सुरुवात करण्यात आली. हे अभियान ५ जूनपर्यंत चालणार आहे. याच कार्यक्रमात पाच समूहांना अर्थसाहाय्य म्हणून प्रत्येकी दीड लाख रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महिला दिनाचे औचित्य साधून १२ मार्च रोजी हा कार्यक्रम घेण्यात आला.
राज्यात सर्वत्र ८ मार्च ते ५ जून या कालावधीत महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविले जात आहे. याच अनुषंगाने बीड पंचायत समितीमध्ये कार्यक्रम घेऊन अभियान प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने संस्थाबांधणी, क्षमताबांधणी, आर्थिक साक्षरता प्रशिक्षण, आर्थिक साहाय्य याबद्दल माहिती देण्यात आली. तसेच आयसीआयसी बँकेकडून पाच समूहांना प्रत्येकी दीड लाख रुपये मंजुरी प्रमाणपत्र देण्यात आले. प्रभारी गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे, जिल्हा व्यवस्थापक आशा पवार, रश्मी गोसावी, बँकेचे प्रतिनिधी माधव मुंडे, जिल्हा व्यवस्थापक मुरहरी सावंत, मनीषा डाळिंबकर, नितीन लवटे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर व समुदाय संसाधन व्यक्ती उपस्थित होत्या. आभार युवराज गारदे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रभाग समन्वयक शैलेश चौधरी, दादासाहेब राख, प्रीतम भोंडवे यांनी परिश्रम घेतले.
===Photopath===
130321\132_bed_10_13032021_14.jpeg
===Caption===
महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाअंतर्गत महिलांच्या समुहांना अर्थसहाय्य प्रमाणपत्र देताना बीडीओ राजेंद्र मोराळे व इतर मान्यवर.