पाटोदा : महासांगवी संस्थानला ह.भ.प. राधाताई सानप यांनी आपल्या कर्तृत्वाने वैभव व प्रतिष्ठा मिळवून दिली. हे संस्थान संस्कृती जोपासणारे अधिष्ठान व्हावे. त्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.संत मीराबाई यांच्या समाधी मंदिरात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली होती, त्यानंतर रविवारी महासांगवी संस्थानने पंकजा मुंडे यांच्या हस्ते कलशारोहण करून सुवर्णयोग साधला. अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता व कलशारोहणाचा सोहळा हजारो भक्तांच्या मांदियाळीत उत्साहात पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या.मठाधिपती ह.भ.प. राधाताई सानप, आ. भीमराव धोंडे, ह.भ.प. तुळशीराम गुट्टे, आ. सुरेश धस, आ. नरेंद्र दराडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या, गहिनीनाथ गडावर आपण संस्कृत विद्यालय मंजूर केले. संत मीराबाई संस्थान देखील संस्कृत बरोबरच संस्कृती जोपासणारे अधिष्ठान होईल असे त्यांनी सांगितले.लेक म्हणून मला अभिमानआपल्याकडे कलशारोहणाला मुलींना बोलावून त्यांचे त्यात योगदान घेण्याची परंपरा आहे.मी गडाची लेक म्हणून मला हे भाग्य मिळाले. त्यामुळे गडाची कीर्ती राज्यभर होण्यासाठी योगदान देणे हे माझे कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या.संस्थानचा विकासग्रामविकास विभागाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून मीराबाई संस्थानसाठी १ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध करुन दिला आहे. आणखी ६५ लाख रुपये लवकरच जमा होतील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.पंकजा मुंडे यांनी गडाच्या सभागृहासाठी ५१ लाख रुपयांचा निधी जाहीर करीत पुढच्या वर्षी गडावर भक्तांसाठी सुसज्ज असे सभागृह उभे असेल. गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.यावेळी साहेबराव थोरवे, जि.प. समाजकल्याण सभापती संतोष हंगे, मधुकर गर्जे, अनुरथ सानप, रामराव खेडकर, महेंद्र गर्जे, श्रीहरी गीते आदींसह पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते.
‘महासांगवी संस्थान संस्कृती जोपासणारे अधिष्ठान व्हावे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:31 PM
महासांगवी संस्थानला ह.भ.प. राधाताई सानप यांनी आपल्या कर्तृत्वाने वैभव व प्रतिष्ठा मिळवून दिली. हे संस्थान संस्कृती जोपासणारे अधिष्ठान व्हावे. त्यासाठी आपण कटीबध्द असल्याची ग्वाही राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.
ठळक मुद्देपंकजा मुंडे : भक्तांच्या मांदियाळीत सप्ताहाची सांगता