माजलगाव पंचायत समितीचा कारभार चालतो ५० वर्ष जुन्या जीर्ण इमारतीमधून; बांधकाम निधी अडकला लालफितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 06:16 PM2018-01-10T18:16:34+5:302018-01-10T18:19:43+5:30

तालुक्याच्या  पंचायत समिती कार्यालयाची इमारतीचे आयुष्यमान ५० वर्ष आहे. आता ही इमारतीत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठीचा निधी 2 वर्षांपूर्वीच मंजूर आहे. असे असताना केवळ टेंडरच्या काढण्याच्या दिरंगाईमुळे बांधकामास मुहूर्त लागत नसल्याने कर्मचा-यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. 

Majalgaon Panchayat Samiti runs from a 50 year old building | माजलगाव पंचायत समितीचा कारभार चालतो ५० वर्ष जुन्या जीर्ण इमारतीमधून; बांधकाम निधी अडकला लालफितीत

माजलगाव पंचायत समितीचा कारभार चालतो ५० वर्ष जुन्या जीर्ण इमारतीमधून; बांधकाम निधी अडकला लालफितीत

googlenewsNext
ठळक मुद्देमाजलगाव पंचायत समितीची इमारत व कर्मचारी निवासस्थाने ही 1967 साली उभारण्यात आली होती. नव्या इमारत व कर्मचा-यांच्या निवासस्थानासाठीचा ९ कोटी रूपयांचा निधी १६ फेब्रुवारी २०१६ लाच मंजुर झाला आहे.

माजलगाव, ( बीड ) : तालुक्याच्या  पंचायत समिती कार्यालयाची इमारतीचे आयुष्यमान ५० वर्ष आहे. आता ही इमारतीत जीर्ण झाली असून मोडकळीस आली आहे. नवीन इमारत व कर्मचारी निवासस्थानासाठीचा निधी 2 वर्षांपूर्वीच मंजूर आहे. असे असताना केवळ टेंडरच्या काढण्याच्या दिरंगाईमुळे बांधकामास मुहूर्त लागत नसल्याने कर्मचा-यांना जीव मुठीत घेऊन काम करावे लागत आहे. 

माजलगाव पंचायत समितीची इमारत व कर्मचारी निवासस्थाने ही 1967 साली उभारण्यात आली होती. या इमारतीस 50 वर्षे उलटली असून प्रशासकिय इमारत व निवासस्थानाची दयनीय अवस्था झालेली आहे. त्यामुळे प्रशासकिय कामे करतांना कर्मचार्‍यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात छत जागोजागी  गळत असते. यामुळे कित्येकदा इमारतीमधील महत्वाची दस्तावेज भिजलेली पहावयास मिळतात. सध्या शासकिय योजनाचा मोठ्या प्रमाणात काम ऑनलाईन झाली आहेत. मात्र येथे सुसज्ज व स्वतंत्र संगणक कक्ष नसल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होते. यासोबतच जीर्ण झालेली हे इमारत केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. यामुळे येथील कर्मचारी जीव मुठीत घेवून कामकाज करावे लागते. 

निधी आहे मंजूर 
इमारत व कर्मचा-यांच्या निवासस्थानासाठीचा ९ कोटी रूपयांचा निधी १६ फेब्रुवारी २०१६ लाच मंजुर झाला आहे. मात्र, या कामाचे टेंडर जिल्हा परिषदेने अद्याप काढले नसल्याने निधी असूनही बांधकामास दिरंगाई होत आहे. याचा फटका मात्र नागरिकांसोबतच येथील कर्मचा-यांना बसत आहे. अनेक कर्मचा-यांना ही जीर्ण अवस्थेतील निवासस्थाने सोडून इतरत्र भाड्याने राहण्याची वेळ आलेली आहे. 

जिल्हा परिषद प्रशासनाची उदासीनता 
निधी जिल्हा परिषदेकडे जमा झाला आहे. बांधकामाबाबत आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष व प्रशासकिय अधिकार्‍यांना वारंवार भेट देऊन पाठपुरावा केला आहे. मात्र तेथील प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेमुळे हे काम रखडले आहे.

 - अलका नरवडे, सभापती 

Web Title: Majalgaon Panchayat Samiti runs from a 50 year old building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedबीड