माजलगाव तहसीलमध्ये तोंडी आदेशाने काढले डोके वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:31 AM2021-02-12T04:31:00+5:302021-02-12T04:31:00+5:30

माजलगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून माजलगाव तहसीलमध्ये वाळू चोरीसंदर्भात कारवाईचे नाट्य खेळून गडगंज होत असलेल्या अधिकारी ...

In Majalgaon tehsil, the head was removed by verbal order | माजलगाव तहसीलमध्ये तोंडी आदेशाने काढले डोके वर

माजलगाव तहसीलमध्ये तोंडी आदेशाने काढले डोके वर

माजलगाव : गेल्या कित्येक महिन्यांपासून माजलगाव तहसीलमध्ये वाळू चोरीसंदर्भात कारवाईचे नाट्य खेळून गडगंज होत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबतीत नागरिकांत कुजबूज आहे. त्यात तहसीलदारांच्या धक्कादायक विधानाने भर पडली आहे. आठवडाभरापूर्वी पकडलेली डस्ट हायवा तोंडी आदेशाने रात्रीतून सोडून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेवरून माजलगाव तहसीलमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून तोंडी आदेशाने डोके वर काढल्याच्या प्रकारास दुजोरा मिळत आहे.

तहसीलच्या पथकाने आठवडाभरापूर्वी डस्टची हायवा गाडी टालेवाडी फाट्याजवळ दुपारी पकडली होती. दरम्यान, गाडी माजलगाव तहसील आवारात आणून उभी करण्यात आली होती. यावेळी तहसीलदारांकडून पंचनामा करून संबंधित गाडीवर व गाडीमालकावर कारवाई होणे अपेक्षित होते. परंतु दररोज चालढकल करून कारवाई लांबवण्यात आली. असे का करण्यात येत आहे, असा प्रश्न निर्माण होत असतानाच मंगळवारी रात्रीतून ही गाडी सोडून देण्यात आली. याबाबत तहसीलदार वैशाली पाटील यांना विचारणा केली असता उपविभागीय अधिकारी श्रीकांत गायकवाड यांच्या तोंडी आदेशाने गाडी सोडून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत उपविभागीय अधिकारी गायकवाड यांना विचारणा केली असता, ही फाईल माझ्या टेबलवर आलीच नाही. असल्या कुठल्याही गोष्टी तोंडी आदेशाने होत नसतात. याची चौकशी करू, असे ते म्हणाले. दोन जबाबदार अधिकाऱ्यांच्या या दुटप्पी विधानांमुळे कोण खरे आणि कोण खोटे बोलतोय, याबाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, महसूलअंतर्गत वाळू वाहनांवर कारवाईचे नाट्य रंगत आहे. वाहने पकडायची, परंतु कागदोपत्री दाखवायचे नाही आणि नंतर तोडपाणी करून सोडून देण्यात येत असल्याची चर्चा कर्मचारी दबक्या आवाजात करत आहेत. दरम्यान, तहसीलच्या तोंडी आदेशाच्या अजब फतव्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले असून, ‘दाल में कुछ काला है’ अशी चर्चा होताना दिसत आहे. याप्रकरणी वरिष्ठांनी लक्ष देऊन तहसीलमधून निघणाऱ्या तोंडी आदेशास लगाम लावण्याची आवश्यकता असल्याचे कर्मचारी वर्गातून बोलले जात आहे.

Web Title: In Majalgaon tehsil, the head was removed by verbal order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.