माजलगावात १५० तर आष्टीत ३४ कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:13 AM2019-03-28T00:13:18+5:302019-03-28T00:14:31+5:30
बीड लोकसभा मतदार संघात होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आष्टी येथे ३४ तर माजलगावात १० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरविली.
आष्टी/ माजलगाव : बीड लोकसभा मतदार संघात होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारी कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. आष्टी येथे ३४ तर माजलगावात १० कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाकडे पाठ फिरविली. गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा तहसील प्रशासनाने बजावल्या आहेत.
आष्टी विधानसभा मतदार संघातील ३९० मतदान केंद्राध्यक्ष, ४८० सहाय्य्क मतदान केंद्राध्यक्ष २०९३ इतर मतदान अधिकाºयांचे प्रशिक्षण होते. यावेळी ३४ अधिकारी, कर्मचाºयांनी प्रशिक्षणासाठी गैरहजर होते.
उपविभागीय अधिकारी नम्रता चाटे, आष्टी तहसिलदार हिरामण झिरवाळ, पाटोद्याच्या तहसीलदार रूपा चित्रक यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी ध्वनीचित्र फीतीद्वारे सर्व कर्मचाºयांना प्रशिक्षण देण्यात आले. सुलेमान शेख, विनोद जफे यांनी प्रात्याक्षिक सादर करुन माहिती दिली.
सर्व अधिकारी, कर्मचाºयांना प्रत्यक्ष हाताळणी करु न प्रशिक्षण देवून प्रशिक्षीत करण्यात आले. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी निवडणूक कामी नियुक्त नायब तहसिलदार शारदा दळवी, नायब तहसीलदार निलिमा थेऊरकर, प्रदीप पाङूळे, सुनिल ढाकणे, गणेश जाधव, किशोर सातव, सर्व मास्टर ट्रेनर, प्रविण मेहेरकर, अजय जायभाय,रमेश घोडके, दिपक गालफडे, पवार यांनी परिश्रम घेतले. आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्यातील अधिकारी, कर्मचारी, बँक कर्मचारी, टपाल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.