माजलगावचा कचरा केसापुरीच्या नदीपात्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:44+5:302021-05-29T04:25:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : शहरातील स्वच्छता करून जमा झालेला कचरा केसापूर येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी ...

Majalgaon waste in Kesapuri river basin | माजलगावचा कचरा केसापुरीच्या नदीपात्रात

माजलगावचा कचरा केसापुरीच्या नदीपात्रात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : शहरातील स्वच्छता करून जमा झालेला कचरा केसापूर येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी टेंडर काढलेले आहे. तरीही संबंधित ठेकेदाराची मनमानी सुरू आहे. हा कचरा ग्राउंडमध्ये न टाकता सिंदफणा नदीपात्रानजीक कचरा टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. याकडे मात्र माजलगाव नगरपालिकेचे दुर्लक्ष होत आहे.

माजलगाव शहरात स्वच्छता करून शहरातील सर्व कचरा केसापुरी येथील डंपिंग ग्राउंडवर टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपालिकेने पावणेदोन कोटी रुपये खर्च करून टेंडर काढले होते. सुरुवातीचे एक-दीड महिना संबंधित ठेकदाराने काम सुरळीत केले. त्यानंतर सर्व नियम धाब्यावर बसवत त्यांनी मनमानी सुरू केली. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याऐवजी हा कचरा जाळून टाकला. त्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे करून तो कचरा टाकण्यात येत होता. यामुळे आपल्या गावातील नागरिकांचे आरोग्य खराब होईल. यामुळे केसापुरी येथील नागरिकांनी विरोध केला होता.

आता तर या ठेकेदाराने मागील चार वर्षांपासून शहरात गोळा केलेला कचरा डंपिंग ग्राउंड घेऊन जाण्याऐवजी तो कचरा सिंदफणा नदीपात्राच्या बाजूला टाकत आहेत. हा कचरा नदीपात्राशेजारी टाकल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. आता पावसाळा तोंडावर आला आहे. पाऊस पडताच हा सर्व कचरा सिंदफणा नदीपात्रात पाण्यासोबत वाहून गेल्यास नदीपात्रातदेखील दुर्गंधी पसरून पाणी घाण होणार आहे.

या नदीपात्रात दररोज शहरातील अनेकजण पाणी पितात, तर अनेकजण या नदीपात्रात अंघोळदेखील करीत असतात. या घाणीमुळे पाणी अशुद्ध झाल्यास अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. असे असताना नगरपालिकेचे पदाधिकारी संबंधित ठेकेदाराला समज देण्याऐवजी त्यास प्रोत्साहन देताना दिसत आहेत.

....

कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराला सिंदफणा नदीपात्राशेजारी टाकण्यात आलेला कचरा उचलून घेऊन जाण्यास सांगण्यात आले आहे. दोन दिवसांत संपूर्ण कचरा उचलण्यात येईल.

-विशाल भोसले, मुख्याधिकारी, नगरपालिका माजलगाव.

===Photopath===

280521\img_20210527_133738_14.jpg~280521\img_20210413_112529_14.jpg

===Caption===

माजलगाव शहरातील कचरा केसापुरी येथील सिंदफणा नदीपात्रात टाकला जात आहे. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Web Title: Majalgaon waste in Kesapuri river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.