बनावट लग्नातला ‘मामा’ गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:45+5:302021-03-16T04:33:45+5:30

आष्टी : तरुणांसोबत बनावट विवाह करून चार-आठ दिवस राहून पैसे उकळणाऱ्या टोळीचा रविवारी पर्दाफाश करत आष्टी पोलिसांनी दोघांना अटक ...

‘Mama’ Gajaad in fake marriage | बनावट लग्नातला ‘मामा’ गजाआड

बनावट लग्नातला ‘मामा’ गजाआड

Next

आष्टी : तरुणांसोबत बनावट विवाह करून चार-आठ दिवस राहून पैसे उकळणाऱ्या टोळीचा रविवारी पर्दाफाश करत आष्टी पोलिसांनी दोघांना अटक केली होती. बनावट लग्न लावून लुटणाऱ्या टोळीतील कधी नातेवाईक तर कधी मामा म्हणून मिरविणाऱ्या तिसऱ्या आरोपीला सोमवारी पोलिसांनी जामखेडमधून ताब्यात घेतले.

आष्टी तालुक्यातील शिराळ येथील तरुणासोबत ९ रोजी विवाह करून एका महिलेने दाेन लाख रुपये दे, अन्यथा मला फसवून आणून बलात्कार केल्याचा खोटा गुन्हा दाखल करेल, अशी मागणी करताच तरुणाने पोलिसात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी सापळा रचून खंडणी वसूल करताना रंगेहाथ पकडून टोळीचा पर्दाफाश केला होता. प्राथमिक चौकशीत महिलेने तब्बल आठ जणांशी विवाह करून खंडणी वसूल केल्याचे समोर आले आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा अंदाज असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले होते. त्या टोळीतील तिसऱ्या आरोपीलादेखील पोलिसांनी जामखेडमधून अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळे, सहायक फौजदार अरुण कांबळे, बन्सी जायभाये, संतोष क्षीरसागर, प्रदीप पिंपळे, सचिन कोळेकर, स्वाती मुंडे, शिवप्रकाश तवले, पो.कॉ. रियाज पठाण यांनी केली. दरम्यान, तीनही आरोपींना न्यायालयाने १७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: ‘Mama’ Gajaad in fake marriage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.