वृद्ध, निराधारांसाठी मानवलोकची ‘कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:32 AM2021-04-10T04:32:58+5:302021-04-10T04:32:58+5:30

बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः मानवलोकमार्फत ३० गावांत निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या सामुदायिक भोजनगृहातील निराधार ...

Mankind's 'Corona Prevention Vaccination Campaign' for the Elderly, Homeless | वृद्ध, निराधारांसाठी मानवलोकची ‘कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम’

वृद्ध, निराधारांसाठी मानवलोकची ‘कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम’

Next

बीड व उस्मानाबाद जिल्ह्यांतील ज्येष्ठ नागरिकांना विशेषतः मानवलोकमार्फत ३० गावांत निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी राबविण्यात येत असलेल्या सामुदायिक भोजनगृहातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी मानवलोक व गिव्ह इंडियामार्फत कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. जवळपास ५ हजार ज्येष्ठ नागरिकांच्या भेटी घेऊन त्यांना कोरोना आजाराबद्दल माहिती देणे, कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करावे व काय करू नये हे समजावणे आणि लसीकरण किती महत्त्वाचे आहे, याबद्दल माहिती देण्याचे कार्य चालू आहे.

या लसीकरण मोहिमेत ३० गावांतील ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत ने-आण करण्याची व्यवस्था, लसीकरण करण्यात मदत, त्यानंतर त्यांच्यासाठी अल्पोपाहार करवून गावात सोडण्यात येत आहे, तसेच लसीकरणानंतर संभाव्य ताप इत्यादी लक्षणांत देखभाल करण्यात येत आहे.

अशा ज्येष्ठ निराधारांसाठी व परिसरातील गरजूंसाठी कोरोना काळात मानवलोक सातत्याने प्रयत्नशील आहे, असे लोहिया यांनी सांगितले.

Web Title: Mankind's 'Corona Prevention Vaccination Campaign' for the Elderly, Homeless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.