दारू विक्री वाढली
आष्टी : तालुक्यात ठिकठिकाणी अवैध दारू बनविली जाते. यामुळे अनुचित प्रकार घडत आहेत. अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी ग्रामीण भागातील महिलांनी दारूबंदीची मागणी केली आहे. तरीही अद्याप या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.
रस्त्याची दुरवस्था
बीड : तालुक्यातील चौसाळा गावांतर्गत जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली असून, पूर्वी हा महामार्ग होता, मात्र बायपास झाल्यामुळे या रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे प्रशासनाने लक्ष घालून रस्ता दुरूस्तीची मागणी आहे.
कठडे गायब
बीड : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अनेक मद्यपी अथवा चोरट्यांनी पुलाला बसवलेले लोखंडी पाईप तोडून भंगारमध्ये नेऊन विकले. त्यामुळे वाहनांना पुलावरून जाताना धोका निर्माण होत आहे.
रीडिंग विना बिले
बीड : गेल्या अनेक दिवसांपासून जे वीजबिल दिले जात आहे ते अनेकदा रीडिंग न घेताच दिले जाते. ग्रामीण भागात तर हा प्रकार सर्रास सुरू आहे. परिणामी वीजबिल मोठ्या प्रमाणात येत आहेत