याप्रकरणी अपहृत विवाहितेच्या पतीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्यापैकी मोठ्या मुलीचे लग्न झालेले असल्याने घरात सध्या दोन मुली आणि मुलासह हे दाम्पत्य राहते. २१ रोजी पती काही कामानिमित्त येरमाळा येथे गेला होता. रात्री ९ वाजता परतल्यावर त्याला घरात पत्नी दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेऊनही न सापडल्याने पतीने २३ डिसेंबर रोजी अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात पत्नी हरवल्याबाबत तक्रार दिली. दरम्यान, बुधवारी या दाम्पत्याच्या मूकबधिर मुलीने तिच्या आईला ज्ञानेश्वर यादवराव बनसोडे (रा. राक्षसवाडी, ता. अंबाजोगाई) याने घरासमोरून घेऊन गेल्याचे वडिलांना खाणाखुणा करून सांगितले. सदर फिर्यादीवरून ज्ञानेश्वर बनसोडे याच्यावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस कर्मचारी गुट्टे करीत आहेत.
चार अपत्यांच्या मातेला फूस लावून पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:32 AM