तारूगव्हाण बंधारा कामासाठी गोदावरी नदीपात्रात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 12:02 AM2019-06-04T00:02:05+5:302019-06-04T00:04:29+5:30
बारा गावच्या नागरिकांनी तारूगव्हाण गोदापात्रात धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांच्या लेखी आश्वसनाने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी मध्यस्थी केली.
माजलगाव : तारूगव्हाण गोदावरी नदीवरील बंधाऱ्याचे काम १३ वर्षांपासून प्रलंबित आहे. अत्यंत धिम्यागतीने काम करण्यात येत आहे. ते काम त्वरित सुरू करून या बंधा-यावरील अवलंबून असणा-या गावकऱ्यांचा पाणी प्रश्न त्वरित सोडविण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील दहा बारा गावच्या नागरिकांनी तारूगव्हाण गोदापात्रात धरणे आंदोलनाला बसलेल्या शेतक-यांना जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.व्ही.नखाते यांच्या लेखी आश्वसनाने आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांनी मध्यस्थी केली.
माजलगाव, परळी, पाथरी तालुक्यातील २५ गावच्या सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्कालिन आघाडी सरकारने पाथरी तालुक्यातील तारूगव्हाण, गोदावरी नदीवरील १२३ कोटी रुपयांचे बंधारा बांधकाम १३ वर्षांपूर्वी सुरू केले होते. या बंधाºयातील पाण्याच्या उपलब्धतेमुळे पाथरीसह माजलगाव तालुक्यातील जवळपास २५ गावांचा पाणी प्रश्न मिटवण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. जवळपास १३ वर्षांपासून बंधाºयाची बांधणी अत्यंत संथ गतीने हे काम सुरू आहे. हा बंधारा पूर्ण होऊन परिसरातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल या अपेक्षेने जवळपास २५ गावांतील शेतकरी चातकाप्रमाणे बंधाºयाचे बांधकाम पूर्ण होण्याची वाट पाहत आहे. परंतु गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ सुस्तावलेल्या अवस्थेत असल्याने हे काम अत्यंत संथपणे सुरू आहे. हे काम गतीने करावी अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली.
त्यामुळे गावक-यांनी तारूगव्हाण बंधाºयाचे काम त्वरित सुरू करावे, या मागणीसाठी गोदावरी पात्रातच सोमवार, ३ रोजी भर उन्हात धरणे आंदोलनाला सुरु वात केली. दरम्यान यावेळी माजीमंत्री सोळंके, धैर्यशील सोळंके, अमित नाटकर, संतोष देशमुख, अनंतराव डक, बाळासाहेब डाके, अनंतराव नायबळ, गोविंदराव झेटे प्रमुख नेत्यांचे २५ गावचे शेतकरी यावेळी आंदोलनस्थळी उपस्थित होते. दरम्यान, या वेळी माजीमंत्री प्रकाश सोळंके, धैर्यशील सोळंके यांनी जलसंपदा अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. तसेच आंदोलकांनी ही या कामाच्या दिरंगाईबद्दल अधीक्षक अभियंता नखाते, संबंधित बांधकाम कंत्राटदारास चांगलेच धारेवर धरले.