बीड : शहरातील विद्युत वितरण विभागाने शहरातील पथदिव्यांचे बिल न.प. प्रशासनाकडून भरणा करण्यात आलेला नाही. याबाबत महावितरण विभागाकडून वेळोवेळी पूर्वकल्पना, माहिती तसेच पत्रव्यवहार करूनही न.प. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने महावितरण विभागाने बीड शहरातील पथदिवे बंद केले आहेत. याचा नाहक त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यासंदर्भात शिवसंग्रामच्या वतीने नगरपालिका कार्यालयासमोर मेनबत्ती लावून आंदोलन करण्यात आले.
बीड नगरपालिका प्रशासनाने गेल्या काळातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे बिल अंदाजे १.५० कोटीचे थकीत आहे. वीज बिल थकीत ठेवल्याने महावितरण कंपनीने शहरातील सर्वच पथदिवे बंद केले आहेत. त्यामुळे नागरिकांना सायंकाळी अंधारातून वाट काढावी लागत आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत शहरातील सर्वच पथदिवे पुन्हा सुरू करण्यात यावे. यासाठी बीड नगरपालिका कार्यालयाबाहेर मेनबत्ती लावून आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसंग्राम युवक आघाडीचे बीड शहराध्यक्ष प्रशांत डोरले, लक्ष्मण दादा ढवळे, सुहास पाटील, शेषराव तांबे, मनोज जाधव, दत्ता गायकवाड, अक्षय माने, कैलास शेजाळ, जकीर हुसेन, अमजद पठाण, अझहर भाई शेख, शेख आबेद, नितीन आगवान, गणेश धोंड, सुशांत सत्रलकर, इम्रान जहागीरदार, प्रकाश जाधव, शैलेश, सुरवासे, सलमान अली, सौरभ तांबे, प्रेम धायजे, तुषार शेंगदे, समीर शेख आदी शिवसंग्राम पदाधिकारी व युवक उपस्थित होते.
===Photopath===
230321\232_bed_25_23032021_14.jpg
===Caption===
बीड नगरपालिकेच्या पुढे शिवसंग्रामच्या वतीने आंदोलन केले यावेळी शिवसंग्रामचे कार्यकर्ते