महावितरणचा शाॅक, वाढीव बिलांसंदर्भात ४२ हजार तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:31 AM2020-12-31T04:31:43+5:302020-12-31T04:31:43+5:30

n लाेकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात लॉकडाऊन काळात कोरोनाचा वाढता संसरर्ग पहाता घरोघरी जावून मिटरची रिडींग घेण्यात आलेली ...

MSEDCL's shock, 42,000 complaints regarding increased bills | महावितरणचा शाॅक, वाढीव बिलांसंदर्भात ४२ हजार तक्रारी

महावितरणचा शाॅक, वाढीव बिलांसंदर्भात ४२ हजार तक्रारी

Next

n लाेकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात लॉकडाऊन काळात कोरोनाचा वाढता संसरर्ग पहाता घरोघरी जावून मिटरची रिडींग घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे महावितरणने मागील बिलांची रिडींग पाहून सरासरीनुसार बीले दिले होते. परंतु ते जास्त आल्याची ओरड ग्राहकांमध्ये होती. यासाठी प्रत्येक उपविभागीय कार्यालयात ग्राहकांसाठी दरबार ठेवण्यात आला. यात १ जुलै ते २८ डिसेंबरपर्यंत तब्बल ४२ हजार ५३ तक्रारी महावितरणकडे आल्या होत्या. यातील ४१ हजार २२९ तक्रारींचे निरसण केल्याचा दावा महावितरणकडून केला जात आहे. परंतु ग्राहकांमध्ये मात्र, आजही वाढीव बिलांसंदर्भात रोष कायम आहे. आता मागील दोन महिन्यांपासून घरोघरी जावून मिटर रिडींग घेणे सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. एकूणच महावितरणच्या कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

बील भरूनही पुन्हा वाढीव बिल देण्यात आले. लॉकडाऊन काळात सरासरी बिले दिल्याचे समजले. त्यानंतरही दाेन वेळा पैसे भरले, परंतु तरीही अडचण दुर झाली नाही. महावितरण कार्यालयात गेल्यावर तेथे कर्मचारीच असतात. हा गोंधळ दूर करावा, अशी मागणी आहे.

- अरविंद पाटील, वीज ग्राहक

महावितरणने भरविलेल्या दरबारात तक्रार केली. प्रत्यक्षात जावूनही भेटलो, परंतु वाढीव बिलांसंदर्भात काहीच मार्ग काढला नाही. एकवेळा बील कमी करू म्हणाले, तर दुसऱ्यांना होत नाही, असे सांगितले. कोणत्या आधारावे वाढीव बिल दिले, हे देखील सांगत नाहीत.

- मंगेश काळे, वीज ग्राहक

Web Title: MSEDCL's shock, 42,000 complaints regarding increased bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.