बीडमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र बंद; आता तूर विकायची कोठे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:45 AM2018-04-19T00:45:29+5:302018-04-19T00:45:29+5:30

बीड जिल्ह्यात नोंदणी केलेले १६ हजार शेतकरी अद्यापही तूर विक्रीच्या प्रतिक्षेत असताना नाफेडच्या आदेशानुसार १८ एप्रिल रोजी हमीदराने तूर खरेदी बंद झाल्याने एसएमएस मिळालेल्या व केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांनी तूर आता कोठे विकायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास ५० ते ६० हजार क्विंटल तूर खरेदीचा प्रश्न ऐरणीवर आला असून खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.

Nafed purchase center closed in Beed; Now where to buy tur? | बीडमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र बंद; आता तूर विकायची कोठे ?

बीडमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र बंद; आता तूर विकायची कोठे ?

googlenewsNext

अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यात नोंदणी केलेले १६ हजार शेतकरी अद्यापही तूर विक्रीच्या प्रतिक्षेत असताना नाफेडच्या आदेशानुसार १८ एप्रिल रोजी हमीदराने तूर खरेदी बंद झाल्याने एसएमएस मिळालेल्या व केंद्रावर आलेल्या शेतकऱ्यांनी तूर आता कोठे विकायची असा प्रश्न निर्माण झाला आहे. जवळपास ५० ते ६० हजार क्विंटल तूर खरेदीचा प्रश्न ऐरणीवर आला असून खरेदी केंद्रांना मुदतवाढ देण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यातील नाफेडच्या १५ केंद्रांवर १ फेब्रुवारीपासून तूर खरेदीला सुरुवात झाली. गोदामात मागील वर्षीची तूर अद्याप पडून असल्याने यंदा खरेदी केलेली तूर साठवणुकीसाठी गोदामच उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली. हा प्रश्न काही अंशी सुटत असतानाच बारदाणाअभावी खरेदी काही ठिकाणी बंद होती. नंतर तूर खरेदी सुरळीत असताना १८ एप्रिल पर्यंतच खरेदी करण्याचे निर्देश नाफेडने दिले. आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकºयांची तूर १८ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत खरेदी करुन मालाची नोंद पाठवावी व गुरुवारी खरेदी करु नये असे निर्देश देण्यात आले आहेत.

१ लाख ५४ हजार ३०३ क्विंटल खरेदी
जिल्ह्यात तूर विक्रीसाठी ३२ हजार ११ शेतकºयांनी आॅनलाईन नोंदणी केली. त्यापैकी १५ हजार ७६४ शेतकºयांची १ फे्रबुवारीपासून १७ एप्रिलपर्यंत १ लाख ५४ हजार ३०३ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली.

९० हजार क्विंटल तुरीला गोदामच उपलब्ध नाही
खरेदीपैकी ६३ हजार ८२० क्विंटल तूर गोदामात पाठविण्यात आली आहे. तर ९० हजार ८२० किवंटल तूर अद्यापही खरेदी केंद्रांवर पडून आहे. या तुरीला गोदाम उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.

१८ एप्रिल रोजी झालेल्या नोंदणीचे काय ?
तूर विक्रीसाठी शेतकºयांना १८ एप्रिलपर्यंत नोंदणीबाबत नाफेडचे निर्देश होते. त्यात १८ एप्रिललाच तूर खरेदी बंदचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १७- १८ एप्रिल रोजी नोंदणी करणाºया शेतकºयांची तूर खरेदी कशी होणार असा प्रश्न आहे.
अडवणूक नको, ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ द्या
हमी केंद्र बंद झाले तर खुल्या बाजारात शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागेल. तूर खरेदीची प्रक्रिया विनातक्रार पूर्ण व्हावी तसेच शेतकºयांची अडवणूक होऊ नये म्हणून शासनाने हमीदराने तूर खरेदीसाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत वाढवावी. पणन मंत्र्यांकडे आम्ही तशी मागणी केली आहे.
- राजकिशोर मोदी
अध्यक्ष बीड जिल्हा कॉँग्रेस कमेटी तथा संचालक, कापूस पणन महासंघ.

बीड येथील गोदामही लवकरच उपलब्ध होईल
केंद्रांवर खरेदी केलेली तूर साठविण्यासाठी गोदामांची अडचण आहे. पुणतांबा, श्रीरामपूर आदी ठिंकाणी तूर पाठविण्यात आली. मार्केटिंग फेडरेशनचे बीड येथील गोदामही लवकरच उपलब्ध होईल. १८ एप्रिलपर्यंतच तूर खरेदीचे आदेश नाफेडकडून मिळालेले आहेत.
- एस. के. पांडव,
जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बीड.

हमी केंद्र नेमके कशाला ?
खुल्या बाजारात व्यापाºयांकडून शेतकºयांची लूट होऊ नये म्हणून हमीभावाने खरेदी केंद्र सुरु केले. मात्र तेथेही अनेक अडचणींचा सामना शेतकरी करत आहेत. तूर खरेदी बंद केल्यास शेतकºयांनी त्यांची तूर पुन्हा व्यापाºयांना विकावी काय? तेथे दराची हमी कोण देणार? असे सवाल शेतकरी करत आहेत.

Web Title: Nafed purchase center closed in Beed; Now where to buy tur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.