राष्ट्रवादी काँग्रेसने सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचारी सेल सुरू करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:26 AM2020-12-26T04:26:11+5:302020-12-26T04:26:11+5:30

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या विविध सेलच्या प्रमुख राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा खा. शरद पवार, अजित ...

NCP should start Retired Officers-Employees Cell | राष्ट्रवादी काँग्रेसने सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचारी सेल सुरू करावा

राष्ट्रवादी काँग्रेसने सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचारी सेल सुरू करावा

Next

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण, मुंबई येथे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या विविध सेलच्या प्रमुख राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा खा. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत २१ ते २३ डिसेंबर २०२० दरम्यान झाली. सदरील कार्यशाळेत विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेदरम्यान प्रा. ईश्वर मुंडे यांनी भविष्यात पक्षवाढीसाठी आपल्या पक्षात सेवानिवृत्त अधिकारी- कर्मचारी सेलची निर्मिती करावी, अशी विनंती खा. शरद पवार यांच्याकडे केली.

यावेळी प्रा.ईश्वर मुंडे म्हणाले, पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना अधिकारी- कर्मचारी यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतलेले आहेत. केंद्र शासनाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांना लागू झालेला वेतन आयोग, वेळोवेळीचे महागाई भत्ते समप्रभावाने त्याच दिनांकापासून राज्य अधिकारी कर्मचारी यांना लागू होतील, असा शासन निर्णय घेतला. याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या उन्नतीच्या अनेक निर्णयामुळे राज्यातील अधिकारी-कर्मचारी आपणांवर खूश आहेत. त्याची उतराई म्हणून त्यांना आपणांस भक्कम साथ देवून आपणांसोबत काम करण्याची इच्छा असते.

अशा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांना पक्षात सन्मानाने प्रवेश देवून त्याच्या जनमताचा लाभ घेतला तर पक्ष बळकट होईल.

सदरील विनंती वजा सूचना खा.शरद पवार यांना आवडली असून याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिले असल्याची माहिती प्रा.ईश्वर मुंडे यांनी दिली.

या वेळी राष्ट्रवादी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रदेश सरचिटणीस राज राजापूरकर, प्रदेश उपाध्यक्ष सतीश दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष ॲड.सचिन औटी, मिडिया सेल प्रमुख अतुल राऊत उपस्थित होते.

Web Title: NCP should start Retired Officers-Employees Cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.