लोकमत न्यूज नेटवर्कबीड : फेब्रुवारीमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील ७०२३ शेतक-यांचे ४४०२ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले असून शासनाच्या निकषानुसार बाधित शेतक-यांना मदतीसाठी सुमारे ४ कोटी ७१ लाख ७ हजार ३८४ रुपयांचा निधी अपेक्षित आहे. प्रशासनाच्या अंतीम अहवालानुसार गेवराई तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.
वातावरणातील बदलामुळे काही दिवसांपुर्वी जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली तर काही ठिकाणी गारपीट झाली. यात शेतकºयांच्या रब्बी पिकांसह फळबागांना फटका बसला. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनस्तरावर देण्यात आल्यानंतर जिल्हा पातळीवरील यंत्रणेने पंचनामे पूर्ण केले. नुकताच शासनाकडे अंतीम अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार गेवराई, शिरुरकासार, माजलगाव आणि केज तालुक्यात नुकसान झाले आहे.गेवराई तालुक्यात ६००८ शेतकºयांच्या ३ हजार ८५४ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले. या तालुक्यात जिरायतीचे २६६५.८ हेक्टर, बागायतीचे १०१६ हेक्टर तर १७२.४५ हेक्टर क्षेत्रातील फळबागांचे नुकसान झाले.
शिरुर कासार तालुक्यात ७५७ शेतकºयांच्या ३९९.६९ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका बसला आहे. यात जिरायती क्षेत्र २३०.६५, बागायती १५५.०४ तर १४ हेक्टरातील फळपिकांचा समावेश आहे.माजलगाव तालुक्यात ११३ शेतकºयांचे ८८.९९ हेक्टर क्षेत्रात नुकसान झाले आहे. यात ७१.५३ हे. क्षेत्र जिरायतीचे, ५.४ हेक्टर क्षेत्र बागायतीचे तर १२.०६ हेक्टर क्षेत्रातील फळपिकांचा समावेश आहे.केज तालुक्यात १४५ शेतकºयांचे ६० हेक्टर आर. क्षेत्रात नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे सर्व शेतकरी फळपिके घेणारे आहेत. या तालुक्यात जिरायती वा बागायती पिकांचे नुकसान झाले नसल्याचा अहवाल आहे. हा अंतीम अहवाल लवकरच शासनाकडे पाठविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासन मदत कधी मिळेल याकडे शेतकºयांचे डोळे लागले आहेत.जिल्ह्यातील नुकसानजिरायती क्षेत्र २९६८ हेक्टरबागायती क्षेत्र ११७६.४ हेक्टरफळपिके २५८.५१ हेक्टरएकूण ४४०२.९ हेक्टर
तालुकानिहाय अपेक्षित निधीगेवराई ३ कोटी ४९ लाख ४७ हजार ५४०शिरुर ३९ लाख १३ हजार ४६०माजलगाव ७७ लाख ६ हजार ३८४केज १० लाख ८० हजारबोंडअळीच्या भरपाईसाठी लागणार ७७ कोटी रुपयेबीड जिल्ह्यात गुलाबी सेंद्रीय बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात मोठी घट झाली. नागपूर अधिवेशनात कृषी मंत्र्यांच्या घोषणेनुसार पंचनाम्याचे सोपस्कर पार पडले. जिल्ह्यात १ लाख १५ हजार हेक्टर आर. क्षेत्रातील कपाशीचे बोंडअळीमुळे नुकसान झाले आहे. यात जवळपास २ लाख ५७ हजार शेतकºयांचा समावेश आहे. त्यांना मदतीसाठी सुमारे ७७ कोटी ५० हजार रुपयांचा निधी लागणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.