आईने धुणीभांडी करून शिकवले; कष्टाचे चीज करत मुलाने नीट परीक्षेत ५९५ गुण मिळविले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 05:06 PM2022-09-08T17:06:19+5:302022-09-08T17:07:50+5:30

NEET EXAM Result : वडिलांच्या निधनानंतर आईने लोकांची धुनी-भांडी करून दिला शिक्षणास आधार

NEET EXAM Result: Mother taught by working homemade servant; After working hard, the boy Vinayak Bhosale scored 595 marks in the NEET exam | आईने धुणीभांडी करून शिकवले; कष्टाचे चीज करत मुलाने नीट परीक्षेत ५९५ गुण मिळविले

आईने धुणीभांडी करून शिकवले; कष्टाचे चीज करत मुलाने नीट परीक्षेत ५९५ गुण मिळविले

googlenewsNext

- अविनाश मुडेगावकर
अंबाजोगाई (बीड) :
आई लोकांची धुणीभांडी करते, कसल्याही भौतिक सुविधा नाहीत, ना शिकवणी, ना कसला आधार तरीही मुलाने हार मानली नाही. यूट्यूबवरील अभ्यासक्रमांचे व्हिडीओ पाहून सेल्फस्टडी करत विनायक अर्जुन भोसले याने नीट परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले आहेत (NEET EXAM Result 2022 ) . अंगी जिद्द व चिकाटी असेल तर आर्थिक स्थिती अडसर ठरत नाही याचा प्रत्यय विनायकने समाजासमोर ठेवला आहे. 

विनायक अर्जुन भोसले रा.सेलू ता. परळी. याच्या वडिलांचे सन-२०१४ मध्ये अपघाती निधन झाले. पतीच्या निधनानंतर खचून न जाता विनायकाची आई सुनीता यांनी लोकांच्या घरची धुनी-भांडी करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवले.त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे. मुलांच्या शिक्षणासाठी सुनीताबाई यांनी अंबाजोगाई गाठले. आर्थिक स्थिती हालाखीची असल्याने त्यांनी अंबाजोगाईत धुणे-भांडी करण्याचे काम सुरू केले. व एकाच छोट्याशा भाड्याच्या खोलीत हे चारजनांचे कुटुंब राहते.याच ठिकाणी सर्वजण एकत्रित अभ्यास करतात.

विनायक याचे दहावीचे शिक्षण माजलगाव येथे झाले. दहावीत असताना तो स्वतः म्हशी चा सांभाळ करून दूध वाटप करून आईला आर्थिक हातभार लावत असे. मात्र अंबाजोगाईत चांगले शिक्षण असल्याने भोसले कुटुंब इथे स्थायिक झाले. विनायक ची आई सुनीताबाई कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी  आजही लोकांची भांडी घासतात.आईचे कष्ट व आर्थिक परिस्थिती याची जाणीव ठेवून विनायकने डॉक्टर होण्याची जिद्द मनात बाळगली.नीट च्या शिकवणीची फिस भरू शकत नसल्याने त्याने यूट्यूब वर अभ्यासक्रमाचे व्हिडीओ पाहून मेहनतीने अभ्यास केला.व नीट च्या परीक्षेत ५९५ गुण प्राप्त केले.

शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा पुढाकार
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत विनायकने जिद्दीने यश संपादन केले. त्याच्या पुढील शिक्षणासाठी आधार माणुसकीचाचे अध्यक्ष अँड.संतोष पवार, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे स्थानिक कार्यवाह बिपीन क्षीरसागर, भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष धनराज सोळंकी, सेवानिवृत्त अभियंता परमेश्वर भिसे, सेवानिवृत्त शिक्षण अधिकारी रविंद लोमटे यांनी धुरा हाती घेतली आहे.

Web Title: NEET EXAM Result: Mother taught by working homemade servant; After working hard, the boy Vinayak Bhosale scored 595 marks in the NEET exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.