आता कोणी नाही राहणार उपाशी, केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार सवलतीत धान्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:25 AM2021-05-29T04:25:48+5:302021-05-29T04:25:48+5:30
बीड : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री गरीब कल्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला मोफत ...
बीड : कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री गरीब कल्याण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाला मोफत धान्य वितरित करण्यात येत आहे. यासोबतच आता पुरवठा विभागाने प्राधान्य आणि एपीएलमध्ये लाभ न घेतलेल्या ४ लाख ६३ हजार ३७६ केशरी शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना कमी किमतीमध्ये धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रक्रियेमध्ये गरीब कल्याण योजना आणि शेतकरी योजनेतून सुटलेल्या कार्डधारकांचादेखील समावेश असणार आहे.
जिल्ह्यातील ३ लाख ४९ हजार ३६९ इतके केशरी कार्डधारक आहेत. या कार्डधारकांना प्रत्येकी एक किलो गहू आणि एक किलो तांदूळ कमी किमतीत वितरित होणार आहे. हे धान्य वितरित करताना गतवर्षीच्या मे ते ऑगस्ट महिन्यात शिल्लक राहिलेल्या कोट्यामधून त्याचे वितरण होणार आहे. दरम्यान, या लाभार्थ्यांमध्ये एपीएल शेतकरी ५ लाख ४० हजार ५५७ कार्डधारकांपैकी ज्यांना लाभ मिळत नाही त्यांना देखील लाभ मिळणार आहे. हे धान्य वितरण जून महिन्याकरिता असणार आहे. दरम्यान, यासंदर्भात शासनाने आदेश जारी केले असून ज्या तालुक्यातील गोदामात धान्य शिल्लक आहे, त्याच ठिकाणी प्राधान्याने लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे. जिल्ह्यात या घडीला २३३ मेट्रिक टन गहू व १७३ मेट्रिक टन तांदूळ शिल्लक आहे. प्रत्येक लाभार्थ्याला ८ रुपये प्रति एक किलो गहू व १२ रुपये किलो तांदूळ एक किलो वाटप केले जाणार आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्वांचेच हाल सुरू असून, सर्वांना मोफत धान्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
जिल्ह्यातील एकूण रेशनकार्डधारक ९३०१९८
अंत्योदय अन्न योजना कार्डधारक ४०२८८
प्राधान्य कटुंब योजना ३४९४६९
एपीएल शेतकरी ५४०५४७
बीपीएलच्या
४०२८८
कुटुंबांना लाभ
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि शेतकरी योजनेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानातून ग्राहकांना स्वस्त धान्य वितरित करण्यात येत आहे.
ही योजना राबविताना केशरी शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आले होते. पहिल्या लाटेच्या वेळीस आलेले धान्य शिल्लक आहे. हे धान्य या योजनेतून वगळलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे.
दरम्यान, ज्याठिकाणी धान्य शिल्लक असेल त्याच तालुक्यातील लाभार्थ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे.
१ किलो गहू
१ किलो तांदूळ
४ लाख ६३ हजारजणांना मिळेल लाभ
या योजनेत जिल्ह्यातील ४ लाख ६३ हजार ३७६ लाभार्थी निवडण्यात आले आहेत. या लाभार्थ्यांना प्रत्येकी १ किलो तांदूळ व १ किलो गहू देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गोदामात २३३ मेट्रिक टन गहू व १७३ मेट्रिक टन तांदूळ शिल्लक आहे. याच कोट्यातून हे सर्व धान्य प्राधान्याने वितरित केले जाणार आहे.
...
उपलब्ध ठिकाणीच होणार वाटप धान्य
शासन निर्णयाप्रमाणे ज्या तालुक्यातील गोदामात धान्य शिल्लक आहे, त्याठिकाणी ते प्राधान्याने वितरित करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मे ते ऑगस्ट कालावधीत कार्डधारकांचे धान्य राहिले त्यांनाचा याचा लाभ मिळणार आहे.
-मच्छिंद्र सुकटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड.
===Photopath===
280521\28_2_bed_24_28052021_14.jpg
===Caption===
धान्य वाटप करताना रेशनकार्डधारक