मांजरसुंबा-केज महामार्गाचे होईना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:42 AM2021-02-25T04:42:23+5:302021-02-25T04:42:23+5:30
दरपत्रकाचा अभाव अंबाजोगाई : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दर्शनी भागात अनेक दुकानदारांनी धान्याचे दरपत्रक लावलेले नाहीत, तसेच अनेक दुकानांमध्ये ...
दरपत्रकाचा अभाव
अंबाजोगाई : तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांमध्ये दर्शनी भागात अनेक दुकानदारांनी धान्याचे दरपत्रक लावलेले नाहीत, तसेच अनेक दुकानांमध्ये तक्रार पेटीदेखील ठेवण्यात आली नाही. त्यामुळे रेशन धान्याचा उपलब्ध साठा व शासकीय किमती याची माहिती ग्राहकांना उपलब्ध होत नाही. रेशन दुकानदारांनी दरपत्रकाचा फलक लावावा, असा नियम असतानाही हा नियम पाळला जात नाही.
पथदिवे बंद
बीड : शहरातील मुख्य रस्त्यांवर तसेच अंतर्गत भागातील पथदिवे रात्रीच्या वेळी बंद असतात. त्यामुळे नागरिकांना मार्गस्थ होणे अवघड होते. यामुळे भुरट्या चोरीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. नगरपालिकेला याविषयी सांगूनही पथदिवे दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.
अवैध दारू विक्री
गेवराई : तालुक्यातील गढी परिसरातील हॉटेल, ढाब्यांमधून गेल्या काही दिवसांपासून अवैध दारू विक्री सुरू आहे. पोलिसांच्या कारवाया थंडावल्याने राजरोस विक्री असल्याचे चित्र दिसून येत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत नियंत्रण आणण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते शहरी भागाला जोडण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली. या रस्त्यांची कामे दर्जेदार झाली नसल्याने, सहा महिन्यांतच या नवीन रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. नवीन झालेल्या या रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते खचल्याने वाहने चालविताना त्रास होत आहे.