शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : अडचणीची परिस्थिती वा द्विधा मनःस्थिती; एकनाथ शिंदे जातात सातारच्या गावी! यावेळी काय घडणार?
2
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
3
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
4
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर
5
"वाढीव मतदानाचे व्हिडीओ चित्रीकरणासह पुरावे सादर करा", नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र
6
"लॉरेन्स बिश्नोईचा जेलमधून शूटर्सना कॉल; म्हणाला, पोलिसांना घाबरु नका, आपल्याकडे वकिलांची फौज"
7
PAN 2.0 नंतर सरकार आता EPFO 3.0 आणण्याच्या विचारात; ATM मधूनच करता येणार 'हे' काम
8
Maharashtra Politics : मोठी बातमी! महायुतीची बैठक रद्द, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्याला जाणार
9
भारतीय गुंडांचा अमेरिकेत 'डंकी'पद्धतीने प्रवेश; लॉरेन्स बिश्नोई टोळीचेही आवडते ठिकाण बनले
10
रोल्स रॉयस घ्यायची असेल तर डाऊन पेमेंट किती करावे लागणार? EMI किती बसणार... जाणून घ्यायला काय हरकत आहे...
11
Shubman Gill कमबॅकसाठी सज्ज; हा घ्या तो १०० टक्के फिट असल्याचा पुरावा (VIDEO) 
12
EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; ३० नोव्हेंबरपर्यंत करा 'हे' काम; अन्यथा होईल मोठं नुकसान
13
अमित शाहांच्या भेटीवेळी चेहऱ्यावर नाराजी, व्हायरल होत असलेल्या फोटोबाबत एकनाथ शिंदे म्हणाले...  
14
गुजरातमध्ये बनावट ऑस्ट्रेलियन डॉलर्सची छपाई, पोलिसांनी चौघांना घेतले ताब्यात
15
'कोणतीही कारवाई करू नका'; जामा मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे कनिष्ठ न्यायालयाला निर्देश
16
F&O मध्ये ४५ नवे स्टॉक्स : Paytm, जिओ, फायनान्शिअल, LIC; Yes Bank सारख्या शेअर्सची एन्ट्री, काय फरक पडणार?
17
PM मोदींच्या सुरक्षेसाठी महिला 'एसपीजी कमांडो', काय आहे व्हायरल फोटोचं सत्य?
18
गोंदियात भीषण अपघात! शिवशाही बस उलटली, ११ जणांचा मृत्यू; मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
19
हळद लागली! शोभिता धुलिपालाला लागली चैतन्यच्या नावाची हळद, समोर आले प्री वेडिंगचे फोटो
20
Maharashtra News: भाजपला एकनाथ शिंदेंच हवेत उपमुख्यमंत्री, काय आहे कारण?

पीकविमा न भरता 'अलरेडी इन्शुअर्ड'ची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 4:21 AM

लोकमत न्यूज नेटवर्क उजनी : प्रधानमंत्री फसला बिमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना २३ जुलैपर्यंतची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उजनी : प्रधानमंत्री फसला बिमा योजनेअंतर्गत खरीप हंगामातील पिकांचा विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना २३ जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. मात्र, पीकविम्याचा फॉर्म भरण्यासाठी जनसेवा केंद्रावर गेल्यावर काही शेतकऱ्यांना वेगळाच अनुभव येतो आहे. पीकविमा भरलेला नसतानाही ‘अलरेडी इन्शुअर्ड'ची सूचना मिळत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

यापूर्वी एकाच क्षेत्रावर अनेक वेळा पीकविमा उचलला असल्याचे प्रकार झाल्यामुळे विमा कंपन्यांनी ऑनलाईन पीकविमा भरून घेण्यास सुरुवात केली आहे. ऑनलाईन विमा भरत असताना शेतकऱ्यांचे शिवारानुसार गट क्रमांक आणि खाते क्रमांक टाकल्यानंतर संबंधित जमीन क्षेत्राची माहिती ऑनलाईन दाखवली जाते. एका क्षेत्रावर एकदाच पीकविमा भरून घेतला जातो. मात्र, यावर्षीचा पीकविमा भरला नसताना पोर्टलवर पीकविम्यासाठी शिवार, पेरणीची तारीख, गट क्रमांक, खाते क्रमांक ही माहिती भरत असताना अगोदरच पीकविमा भरला असल्याची सूचना येत असून, माहिती अपलोड करण्यात अडचण येत आहे.

संबंधित क्षेत्रावर पीकविमा अगोदरच भरला आहे. असे दाखवत असल्याने अशा क्षेत्रातील पीकविमा भरण्यास अडचण येत असून, अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार आहेत.

यावर्षीचा खरीप हंगाममधील पिकांचा विमा भरणे सुरू आहे म्हणून पीकविमा भरण्यासाठी गेलो असता शेतीसंबंधी माहिती भरल्यावर अगोदरच पीकविमा भरल्याचे केंद्रचालक सांगत आहेत. मात्र, मी यावर्षी पीकविमा भरलेला नाही. पीकविमा भरून घेत नसल्याने माझ्यासारखे अनेक शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार आहेत. - मंचक नागोराव कातकडे, शेतकरी, कातकरवाडी.

पीकविमा पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने विमा भरणा सुरू आहे. मात्र, काही शेतकऱ्यांच्या शेतीसंबंधी माहिती भरल्यानंतर संबंधित क्षेत्राचा पीकविमा अगोदरच भरल्याचे दाखवले जात आहे. मात्र, विमा भरला नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. अशा शेतकऱ्यांचा पीकविमा भरण्यास अडचणी येत आहेत. -- ज्ञानेश्वर भोसले, केंद्रचालक जनसेवा केंद्र, उजनी