मोरांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:30 AM2021-04-03T04:30:11+5:302021-04-03T04:30:11+5:30

आरोग्याची काळजी घ्या अंबाजोगाई : सध्या वातावरणात बदल झाल्याने व उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला ...

The number of peacocks increased | मोरांची संख्या वाढली

मोरांची संख्या वाढली

Next

आरोग्याची काळजी घ्या

अंबाजोगाई : सध्या वातावरणात बदल झाल्याने व उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यातच अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा वाढता संसर्ग यामुळे अनेक नागरिकांना सर्दी, ताप येणे, मळमळणे असे विविध आजार जाणवू लागले आहेत. या आजारांपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच कोरोनाची साथ सुरू असल्याने लक्षणे आढळतात. रुग्णालयात जाऊन कोरोनाची तपासणी करा व स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल धाकडे यांनी केले आहे.

रिकाम्या बाटल्यांमुळे डोकेदुखी वाढली

अंबाजोगाई : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज परिसर, रेणुकादेवी परिसर, बाराखांबी परिसर व वन विभागातील वृक्षाच्या खाली प्लास्टिकच्या ग्लासांसह रिकाम्या मद्याच्या बाटल्यांचा मोठा खच पडला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक मद्यपी आपली पिण्याची हौस भागविण्यासाठी या निसर्गरम्य वातावरणाचा सहारा घेऊ लागले आहेत. मद्यपान करून रिकाम्या बाटल्या या परिसरात फेकून तो परिसर अस्वच्छ करू लागले आहेत. अशा मद्यपींवर पोलिसांनी करडी नजर ठेवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होऊ लागली आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन, कारवाई सुरू

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलिस यंत्रणेच्या वतीने शहरात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सकाळी ७ ते १ या वेळेत शहरवासीयांसाठी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. मात्र, दुपारी एक नंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या युवकांवर कारवाईचा बडगा प्रशासनाच्या वतीने उगारण्यात आला आहे. जे नागरिक नियमांचे उल्लंघन करतात. त्यांना पोलिसांच्या वतीने चोप दिला जात आहे.

दारे नसलेले विद्युत जनित्र धोकादायक

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बहुतांश ठिकाणी असणाऱ्या जनित्र विद्युत पेट्यांची दारे तुटलेले आहेत. तर अनेक विद्युत पेट्यांना दरवाजेच नाहीत. ही स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अनेक विद्युत जनित्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. रस्त्याची उंची वाढल्याने हे जनित्र सहज हाताला येतात. त्यामुळे संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात आहे. तर ग्रामीण भागात जनावरे कधीही अशा विद्युत पेट्यांकडे जाऊ शकतात. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी जनित्रांना दरवाजे बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देशपांडे यांनी केली आहे.

===Photopath===

020421\022_bed_7_02042021_14.jpg

===Caption===

मोर

Web Title: The number of peacocks increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.