माजलगाव धरणाखालील भागात सिंधफणा नदीपात्र असल्याने, या पात्रातून पाण्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे धरणाच्या गेटच्या काही अंतरावर शेतकऱ्यांना जाण्यासाठी सिंदफणा नदीपात्रावर पूल बांधण्यात आला होता. या पुलामुळे शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी चांगला फायदा होत होता. आठ दिवसांपूर्वी या धरणातून सिंदफणा नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात आल्याने पुलाच्या दोन्ही बाजू वाहून गेल्या आहेत. बाजूला असलेला रोडही वाहून गेल्याने या भागातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. सध्या शेतात अनेक कामे सुरू असल्याने, शेतकऱ्यांना दररोज शेतात जावे व यावे लागते, तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाच्या दोन्ही बाजू भरून घेऊन पूल चालू करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
150921\15bed_1_15092021_14.jpg