बीड जिल्ह्यात बाहेरच्या गुन्हेगारांचे उपद्व्याप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 01:10 AM2018-02-23T01:10:41+5:302018-02-23T01:11:18+5:30

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरी, दरोडे, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे गुन्हेगार बीड जिल्ह्यातील नसून शेजारील जिल्हा व कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार व इतर राज्यांतील असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांना जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आलेले आहे. परंतु बाहेरचे गुन्हेगार बीड जिल्ह्यात उपद्व्याप करीत असल्याचे वारंवार घडणाºया घटनांवरून दिसून येते.

Offenders' Offices in Beed district | बीड जिल्ह्यात बाहेरच्या गुन्हेगारांचे उपद्व्याप

बीड जिल्ह्यात बाहेरच्या गुन्हेगारांचे उपद्व्याप

googlenewsNext
ठळक मुद्देचोरी, दरोडे, लुटमारीत अग्रेसर : बीड जिल्ह्यातील गुन्हेगार आहेत जेरबंद

बीड : मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरी, दरोडे, लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे गुन्हेगार बीड जिल्ह्यातील नसून शेजारील जिल्हा व कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार व इतर राज्यांतील असल्याचे पोलीस तपासातून निष्पन्न झाले आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांना जेरबंद करण्यात बीड पोलिसांना यश आलेले आहे. परंतु बाहेरचे गुन्हेगार बीड जिल्ह्यात उपद्व्याप करीत असल्याचे वारंवार घडणाºया घटनांवरून दिसून येते.

केज तालुक्यातील कुंबेफळ येथील सराफा व्यापारी विकास थोरात यांना रस्त्यात आडवून त्यांच्या अंगावर गाडी घालून ठार केले. त्यानंतर त्यांच्याजवळील साडेचार लाख रुपये किंमतीच्या दागिन्यांची पिशवी घेऊन लुटेरे पसार झाले. यातील एक चोरटा हा विहिरीत पडला होता. त्यानंतर अवघ्या चार तासात पोलिसांनी इतर तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. चौकशी केली असता ही एक कुख्यात गुन्हेगारांची टोळी असल्याचे समोर आले.

विहिरीत पडलेला अमोल उर्फ आर्याभाई संभाजी मोहिते (रा. कोल्हापूर) हा टोळीचा म्होरक्या असल्याचे समोर आले. याच्यावर एक दोन नव्हे तर तब्बल २० गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर कोल्हापूर पोलिसांनी मोकाही लावलेला आहे. याच्यासोबत असणारा दुसरा आरोपी सुतार हा कर्नाटक राज्यातील बेळगाव येथील रहिवाशी होता. या गुन्ह्यात ही टोळी परराज्यातील असल्याचे समोर आले.

साधारण दोन महिन्यांपूर्वी परळी शहरातही एकाच रात्री दोन घरफोड्या झाल्या होत्या. यामध्ये नागरिकांच्या सजगतमुळे दोन चोरटे पकडण्यात पोलिसांना यश आले होते. हे चोरटे मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे तपासातून समोर आले. तसेच गेवराई तालुक्यातील धोंडराई येथे आठवड्यापूर्वी साखरे कुटुंबावर हल्ला करून ऐवज लंपास करणारे लुटारूही शेजारील जिल्ह्याचे आहेत. पोलिसांना त्यांची नावे समजली असली तरी अद्याप त्यांना ताब्यात घेण्यात यश आलेले नाही.

अंबाजोगाई न्यायालयाचा तपास अद्याप रखडलेलाच असला तरी याच शहरातील एका कुटुंबाला चाकुचा धाक दाखवून लाखो रूपये लुटल्याची घटना घडली होती. यामध्ये एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. त्याला ताब्यात घेतल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. परंतु त्याचा साथिदार हा परभणी जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात आले.

तसेच माजलगाव येथेही कपड्याचा ट्रक लुटला होता. पोलिसांनी तपास लावल्यानंतर हे चोरटे दुसºया राज्यातील असल्याचे समजले. या सर्व परिस्थितीवरून जिल्ह्यात घडणाºया गुन्ह्यांमध्ये शेजारील जिल्हे व परराज्यातील टोळीचा हात असल्याचे समोर येत आहे.

बीडमधील आरोपींवर मोका, एमपीडीए, तडीपार
जिल्ह्यात असणाºया गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात जिल्हा पोलीस दलाला यश आले आहे. आतापर्यंत दोन टोळ्यांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्या व लोकांमध्ये दहशत निर्माण करणाºया आरोपींवर एमपीडीए व तडीपारची कारवाया करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील गुन्हेगार बºयापैकी पोलिसांनी जेरबंद केले आहेत.

गुन्हेगारांना पकडण्याचे आव्हान
जिल्ह्यातील गुन्हेगारांना पकडण्यात पोलीस यशस्वी ठरले आहेत. परंतु बाहेर राज्यातून अथवा शेजारील जिल्ह्यातून येऊन बीड जिल्ह्यात गुन्हे करणाºयांवर वचक बसविणे पोलिसांसमोर आव्हान आहे. स्थानिक गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक व संबंधित पोलीस ठाण्यांचे पथके नेहमीच वेगवेगळ्या राज्यात तपासासाठी गेलेले आढळून येतात.

नेमकं कोण कमी पडतंय ?
जिल्ह्यात गुन्हेगारी करणारे आरोपी हे अहमदनगर, जालना, परभणी, उस्मानाबाद, कर्नाटक, मध्यप्रदेश, बीहार, पुणे आदी ठिकाणचे आहेत. हे आरोपी पकडण्यात तेथील स्थानिक पोलिसांना यश येत नाही की जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यात बीड पोलीस अपयशी ठरताहेत, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये वचक ठेवण्यात यश
जिल्ह्यातील गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात बीड पोलसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे, दरोडा प्रतिबंधक पथक व पोलीस ठाणे यांच्या परिश्रम कामी आले.
परंतु आजही अनेक अधिकारी, कर्मचारी कर्तव्यात हालगर्जीपणा करीत असल्याचे दिसते. त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाते, हे ही तितकेच खरे.

Web Title: Offenders' Offices in Beed district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.