धारूर (बीड ) : धारूर-तेलगाव रस्त्यावर घाटात एका अवघड वळणावर गुरुवारी रात्री धान्याचा एक ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातामुळे ट्रकमधील पोते रस्त्यावर अवास्तव पसरले आहेत. मृत हा गाडी मालक असून सकाळी उशिरापर्यंत ट्रकखालील मृतदेह काढण्यात यश आले नव्हते.
मध्यराञी साडेबारा ते एकच्या सुमारास एक ट्रक (क्र.एम एच 40 - बी जी 2302) लातूरहून दिंडोरीकडे ज्वारी घेऊन जात होता. धारूर-तेलगाव रस्त्यावरील घाटात एका अवघड वळणावर हा ट्रक उलटला. यात गाडीचे चालक व मालक असणारे रंगनाथ माणीस भिसे (४५, रा.लातूर) हे गाडी खाली अडकून जागीच ठार झाले.
अपघातामुळे ट्रकमधील धान्य बाहेर पडून रस्त्यावर अवास्तव पसरले होते. यामुळे वाहतुकीस अडथला निर्माण झाला होता. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आर एस मोरे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात पाठवून वाहतुक सुरळीत केली. यासोबतच गाडीतील बबन नामदेवा तेंलगे, बाळासाहेब हरीशचंद्र माने हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर धारूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. धारूर पोलीस स्टेशनमध्ये अपघाताची नोंद करण्यात आली असून असून पुढील तपास पोहेका. बास्टे करत आहेत