फुले विद्यालयातर्फे ऑनलाइन कथाकथन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:26 AM2020-12-26T04:26:06+5:302020-12-26T04:26:06+5:30

माजलगाव : दरवर्षी साने गुरुजी जयंती आणि बालिका दिनानिमित्त महात्मा जोतिबा फुले विद्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन ...

Online storytelling competition by Phule Vidyalaya | फुले विद्यालयातर्फे ऑनलाइन कथाकथन स्पर्धा

फुले विद्यालयातर्फे ऑनलाइन कथाकथन स्पर्धा

Next

माजलगाव : दरवर्षी साने गुरुजी जयंती आणि बालिका दिनानिमित्त महात्मा जोतिबा फुले विद्यालयामार्फत घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेचे आयोजन यंदा ऑनलाइन स्वरूपात होत असल्याची माहिती संयोजन समितीने दिली. ४ जानेवारीपर्यंत स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

४ जानेवारीपर्यंत स्पर्धकांनी आपली कथा ही व्हिडिओ बनवून संयोजन समितीला पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी स्पर्धकांनी कथेची निवड करताना ती बोधपर असावी, कथा सादरीकरण करण्यासाठी इयत्ता पहिली ते चौथीसाठी पाच मिनिटे वेळ असणार आहे. पाचवी ते दहावीसाठी ७ मिनिटांचा व्हिडिओ सादर करावा लागणार आहे. तालुक्यातील प्रत्येक शाळेने प्रत्येक गटातून स्पर्धक सहभागी करण्याचे आवाहन केले आहे. स्पर्धकांनी स्वतःचे नाव, शाळेचे नाव सांगून कथेला सुरुवात करावी या तिन्ही गटातून विजयी होणाऱ्या स्पर्धकांना सहभागी प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह आणि रोख स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन मुख्याध्यापक प्रदीप भिलेगावकर, प्रभाकर साळेगावकर यांनी केले आहे.

Web Title: Online storytelling competition by Phule Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.