शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
2
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
3
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
4
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
7
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
8
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
14
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
16
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
18
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
19
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
20
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी

माजलगावं धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 7:15 PM

 वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

माजलगांव  (बीड ) :  वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे माजलगांव धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावत चालला आहे. सध्या माजलगांव धरणात केवळ १८ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाळ्याचा आणखी एक महिना शिल्लक असल्याने प्रशासनाकडुन धरणातील साठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित करण्याची तयारी सुरु झाली आहे. 

गेल्यावर्षी परतीच्या पावसामुळे माजलगांव धरण हे १०० टक्के भरले होते यामुळे शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे परिसरात मोठया प्रमाणावर उसाची लागवड झाली. त्यासाठी व इतर पिकांसाठी माजलगांव धरणातुन पाच पाणीपाळया देण्यात आल्या. यात खरीपासाठी एक तर रब्बीसाठी चार पाळया देण्यात आल्या. उन्हाळी पाळया आता पर्यंत 3 देण्यात आल्या असुन अजुन एक पाळी देणे बाकी आहे. धरणाच्या बॅक वाॅटरवरुन बीड शहर, माजलगांव शहर व इतर आजुबाजुचे खेडेपाडयांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. तसेच धरणातुन अनेक शेतक-यांनी पाईपलाईनद्वारे आपल्या शेतीसाठी पाणी घेतलेले आहे.  यातील ९० टक्के शेतक-यांनी कसल्याही प्रकारचा परवाना न घेता पाणी उपसा सुरु ठेवलेला आहे. 

४ मिटरने खालावली पातळी माजलगांव धरणाची एकुण पाणसाठयाची क्षमता ही ४३१.८० मिटर एवढी आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत ही पाणी पातळी ४२७.६० मिटरवर आली आहे. धरणाची पातळी ४ मिटरपेक्षा जास्त खालावली आहे. धरणामध्ये एकुण साठा २०६.२०  द.ल.घ.मि. असुन पैकी जिवंत साठा हा ६४. २०  द.ल.घ.मी. म्हणजेच १८. ५९ टक्के इतका राहिलेला आहे. माजलगांव धरणातुन दररोज ०.५३५ द.ल.घ.मी. येवढे पाणी पिण्यासाठी तसेच बाष्पीभवनामुळे उत्सर्जीत होत आहे. 

एकंदरीत माजलगांव धरणातील पाणी साठयाची उपलब्धता पाहता भविष्यात शेतक-यांना एक उन्हाळी पाळी दिल्यास जिवंत पाणीसाठयामध्ये मोठी घट होणार असुन प्रशासकिय पातळीवर पाणीपाळी द्यावी किंवा नाही या बाबत विचारविनिमय होत आहे. मात्र पावसाळा सुरु होण्यासाठी अजुनही एक महिन्याचा कालावधी असल्यामुळे पाणी पाळी शेतक-यांना न दिल्यास त्यांचे देखील मोठे नुकसान होणार असल्याचे दिसुन येते. 

पाणी जाऊन वापरावे माजलगांव धरणातील पाणी साठा हा पुरेसा असला तरी नागरीकांनी व शेतक-यांनी पाण्याचा वापर हा जपुन केल्यास भविष्यात पाण्यासाठी अडचणी होणार नाहीत.-  राजेंद्र दहातोंडे, धरण अभियंता  

टॅग्स :Majalgaon Damमाजलगाव धरणwater shortageपाणीटंचाईdroughtदुष्काळ