बीड : छावणी प्रस्तावाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाने ८९ छावण्यांचे प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे पाठवले होते. मात्र त्यापैकी फक्त २५ प्रस्तावांना संमती देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यापैकी जवळपास २५ प्रस्ताव आ. सुरेश धस यांच्या आष्टी तालुक्यातील असल्याची माहिती आहे.जनावरांना दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा-पाणी उपलब्ध व्हावा यासाठी चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय शासनाच्या वतीने घेऊन तीन महिने उलटले आहेत. मात्र अद्यापपर्यंत चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली नाही. जनावरं चाऱ्यावाचून मेल्यावर छावण्या सुरु करणार का ? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. छावण्या मंजूर करण्याचा अधिकार पालकमंत्र्यांना देण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शासनाने चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय घेऊन तीन महिने होत आहेत. मात्र अद्याप छावण्यांना मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यानंतर पालकमंत्र्यांना छावण्यांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे अधिकार देण्यात आले होते.प्रशासनाकडून छावणी प्रस्तावांची प्रक्रिया पूर्ण करुन जवळपास ८९ प्रस्ताव पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठवले व दुसºया टप्प्यात २०३ प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत. मात्र पालकमंत्री मुंडे यांनी ८९ पैकी फक्त २५ प्रस्तावांना संमती दिली आहे. त्यामुळे चारा छावण्यांचे शेकडो प्रस्ताव धूळखात पडल्याची स्थिती आहे. या आठवड्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर छावणी समंतीचे अधिकार प्रशासनाला दिले जातील का ? याबाबत शंका उपस्थित होत आहे.या गंभीर परिस्थितीमध्ये आजच्या तारखेपर्यंत छावण्या सुरु होणे अपेक्षित असताना पालकमंत्र्यांच्या संमतीची अट असल्यामुळे छावण्या सुरु होऊ शकल्या नाहीत, अशी चर्चा आहे.
छावणीच्या ८९ पैकी फक्त २५ प्रस्तावांना संमती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 12:16 AM
छावणी प्रस्तावाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाने ८९ छावण्यांचे प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे पाठवले होते. मात्र त्यापैकी फक्त २५ प्रस्तावांना संमती देण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. यापैकी जवळपास २५ प्रस्ताव आ. सुरेश धस यांच्या आष्टी तालुक्यातील असल्याची माहिती आहे.
ठळक मुद्देपुन्हा ‘धस’ पॅटर्न : समंती मिळालेले २५ प्रस्ताव आष्टी तालुक्यातील; आचारसंहिता लागल्यावर कोण घेणार निर्णय ?