बीड : जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांच्या प्रक्रियेत आॅनलाईन अर्जात चुकीची माहिती भरणाºया शिक्षकांना पाठिंशी न घालता कठोर कारवाई करावी असे निर्देश राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या कक्ष अधिका-यांनी मुख्य कार्यकारी अधिका-यांना दिले आहेत. बीड जिल्ह्यात अनेक शिक्षक विस्थापित झाल्यामुळे बदल्यांमधील गैरप्रकार उघड झाला. त्या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी तक्रारी केल्यानंतर हे निर्देश देण्यात आले.
जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये गुरुजींनी चुकीची माहिती भरुन शासन व प्रशासनाची दिशाभूल केली. बदली प्रक्रियेतील त्रुटी तसेच पात्र असताना शिक्षकांवर अन्याय झाला असून चुकीची माहिती सादर करुन बदलीचा लाभ घेतलेल्या शिक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्टÑ राज्य कॉस्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाने मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे केली होती.
तसेच जोपर्यंत संवर्ग- १ व संवर्ग- २ ची कागदपत्रे तसेच वैद्यकीय तपासणी करुन दोषी शिक्षकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अन्यायकारकरित्या विस्थापित झालेल्या ािक्षकांचे बदली आदेश निर्गमित करु नयेत अशी मागणी केली होती. दरम्यान या संदर्भात राज्याच्या ग्रामविकास मंत्रालायाकडेही तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामविकास मंत्रालयाच्या कक्ष अधिकाºयांनी राज्यातील सर्वच मुख्य कार्यकारी अधिकाºयांना बदली प्रक्रियेबाबत माहिती कळविली आहे.
जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत विशेष संवर्ग- १, विशेष संवर्ग- २ व संवर्ग ४ मध्ये पती- पत्नी एकत्रीकरणांतर्गत अर्ज भरलेल्या शिक्षकांनी सदरचे अर्ज भरताना त्यांच्याकडे या संवर्गाला अनुसरुन असलेली कागदपत्रे असतील, व ती सत्य असतील असे गृहित धरुन या जिल्हांतर्गत बदल्या करण्यात आल्याचे व शिक्षकांची वर्तणूक प्रशासनाप्रती सत्यतेची असणे अपेक्षित असल्याचे यात नमूद केले आहे.मात्र बीड जिल्ह्यात काही शिक्षकांनी दिशाभूल करुन फसवणूक केल्याचे प्रकार पुढे आल्याने शासन, प्रशासनाने शिक्षकांवर ठेवलेल्या विश्वासाला तडा गेल्याचे दिसत आहे.
पाठीशी घालू नकाजिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत सादर केलेल्या अर्जात बनावट माहिती दर्शवून बदल्या करुन घेतल्या असतील तर अशा शिक्षकांवर कारवाई करावी, अशा शिक्षकांना यत्किंचितही पाठिशी न घालता त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी असे ग्रामविकास मंत्रालयाच्या कक्ष अधिका-यांनी सूचित केले आहे.
सरसकट तपासणी, कारवाई होणारबदल्यासंदर्भात कागदपत्र तपासण्याबाबत गटशिक्षणाधिका-यांना कळविलेले आहे. चुकीची माहिती दर्शविणाºया दोषी शिक्षकांचे कारवाईसाठीचे प्रस्ताव पाठविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. बदली झालेल्या सर्वच शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी सुरु आहे. लवकरच अहवाल प्राप्त होईल, असे शिक्षणाधिकारी भगवानराव सोनवणे यांनी सांगितले.