शहरातील व्यापाऱ्यांसाठी सुरू असलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्ट मोहिमेमध्ये रविवारी शहरातील चार तपासणी केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत ७४४ व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी झाली. यामध्ये आयटीआय कोविड केअर सेंटरमध्ये १४६ जणांची कोरोना चाचणी झाली. यात ८ अहवाल पॉझिटिव्ह आले. जि.प. प्राथमिक शाळा अशोकनगर येथे १०७ व्यापाऱ्यांची तपासणी झाली, यात ४ अहवाल पॉझिटिव्ह आले. राजस्थानी विद्यालयात २७२ जणांची तपासणी झाली. याठिकाणी ५ बाधित रुग्ण निष्पन्न झाले. तसेच चंपावती प्राथमिक विद्यालयात २१९ व्यापाऱ्यांची कोरोना तपासणी झाली. यात सर्वाधिक ७ व्यापाऱ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्हा आराेग्य अधिकारी डॉ.आर.बी. पवार यांनी ही माहिती दिली.
सहा दिवसात १३५ व्यापारी बाधित
बीड शहरात १० ते १५ मार्चदरम्यान व्यापारी, विक्रेत्यांची अँटिजेन टेस्ट मोहीम राबविण्यात आली. या दरम्यान ३०९५ व्यापाऱ्यांनी चाचणी करून घेतली. यात १३५ व्यापारी कोरोना बाधित निषन्न झाले. चाचणीदरम्यान पहिल्या दिवशी ९, दुसऱ्या दिवशी ११, तिसऱ्या दिवशी २५, चौथ्या दिवशी ३७, पाचव्या दिवशी २९ तर सहाव्या दिवशी २४ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.