केजमध्ये पानटपरी, हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:33 AM2021-03-16T04:33:41+5:302021-03-16T04:33:41+5:30
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १३ मार्च रोजी जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा आदेश काढला आहे. त्यानुसार, ...
जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी १३ मार्च रोजी जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा आदेश काढला आहे. त्यानुसार, १५ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व पानटपरी व हॉटेल्स बंद करण्याचा आदेश असताना, केजमध्ये पानटपरी व हॉटेल उघडे ठेवून गर्दी जमविल्याची माहिती पोलिसांना मिळून आली. त्यानंतर, पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशानुसार सहायक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब काळे व अशोक नामदास, गुन्हे तपास शाखेचे दिलीप गित्ते यांना सहा पानटपरी व एक हॉटेल बंदी आदेश डावलून उघडे असल्याचे आढळून आले. त्यानुसार, सरकारतर्फे पोलीस नाईक अशोक नामदास यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, केज पोलीस ठाण्यात पानटपरी चालक श्रीकांत नंदकिशोर सोनवणे, सचिन आनंदराव सत्वधर, शेख सलीम सत्तार, आसेफ इसाक तांबोळी, अलताफ मोहम्मद हुसेन, महादेव उत्तरेश्वर देशमाने व हॉटेल चालक सय्यद मोहसीन शाकेर यांच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व साथरोग प्रतिबंधक कायदा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.