विजेच्या लपंडावाने परळीकर झाले त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:45 AM2018-07-06T00:45:59+5:302018-07-06T00:47:08+5:30

शहरात विजेचा वारंवार लपंडाव होत असून, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून दिवसभर वीज बंद करुनही महावितरणची ही तयारी सपशेल अपयशी ठरली आहे.

Paralikar got injured due to lightning | विजेच्या लपंडावाने परळीकर झाले त्रस्त

विजेच्या लपंडावाने परळीकर झाले त्रस्त

Next
ठळक मुद्देदैनंदिन व्यवहार विस्कळीत : महावितरणची मान्सूनपूर्व तयारी ठरली अपयशी, जनता वैतागली

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : शहरात विजेचा वारंवार लपंडाव होत असून, वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून दिवसभर वीज बंद करुनही महावितरणची ही तयारी सपशेल अपयशी ठरली आहे. मंगळवारी सिंचन भवन फिडर बंद पडल्यानंतर काही भागात संपूर्ण रात्रभर वीजपुरवठा खंडित होता. दुसऱ्या दिवशी सकाळी महावितरणच्या कर्मचाºयांनी प्रयत्न करुन काही वेळापुरता वीजपुरवठा सुरु केला. मात्र, फॉल्ट सापडत नाही असे कारण पुढे करीत वीजपुरवठा बंद ठेवण्याची प्रक्रिया पुढे सुरुच होती. हा प्रकार केवळ एका भागापर्यंत मर्यादित नसून, परळी शहरात दिवसभर वीजपुरवठा अधूनमधून खंडित होण्याची पद्धतच सुरु झाली की काय? अशी शक्यता व्यक्त होत आहे.
शहरातील वीजपुरवठा मागील काही दिवसांपासून सातत्याने खंडित होत असून ‘आता होती, आता नाही’ असे वीजपुरवठ्याबाबत एक समीकरण रुढ झाले आहे. खरे पाहता मान्सूनपूर्व वीजपुरवठा सतत कायम रहावा, यासाठी महावितरणने दिवसभर वीजपुरवठा बंद करुन मोठे काम हाती घेतले होते. मात्र, महावितरणची ही तयारी सपशेल अपयशी ठरली आहे. वारा अथवा पाऊस असो किंवा नसो वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले आहेत. मागील काही दिवसांपासून होणाºया विजेच्या लपंडावामुळे वीज ग्राहक त्रस्त आहेत.
पॉवर हाऊससाठी असलेले दूरध्वनी मागेच बंद करण्यात आले असून, फ्यूज कॉलसाठी दिलेले मोबाईल क्रमांक सर्वांकडे नसल्याने तक्रार करायची तरी कोठे असे ग्राहकांतून बोलले जात आहे.
तारीख निघून गेल्यावर बिल ग्राहकांच्या हाती
४परळी शहरात वीज ग्राहकांना वापरलेल्या विजेचे बिलसुद्धा देण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बिल येत नाही, आले तर ते रिडींगप्रमाणे नसते आणि सर्व काही योग्य असेल तर शेवटची तारीख निघून गेल्यावर बिल ग्राहकांच्या हाती दिले जाते.
४विजेच्या तक्रारीसोबत बिलाच्याही तक्रारी वाढत असताना महावितरणकडून मात्र कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. शहरात होणारा वीजपुरवठा खंडित होत असतांना त्याच्या दुरुस्तीचेही प्रयत्न चांगल्या पद्धतीने होत नाही.
४रोजच वीजपुरवठा खंडित होत असल्याने नेहमीच तक्रारी करायच्या का? असाही सूर ग्राहकांमध्ये असून, महावितरणच्या कार्यालयात किंवा फ्यूज कॉलवर मात्र समाधानकारक उत्तरे मिळत नाही.

Web Title: Paralikar got injured due to lightning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.